Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजतर्फे दुभंगलेले ओठ व टाळूच्या रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

पिंपरीत ५ ते ७ डिसेंबरदरम्यान आयोजन

पिंपरी चिंचवड | डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी आणि सरकारी नोंदणीकृत वैद्यकीय चॅरिटेबल ट्रस्ट मिशन स्माईल यांच्या संयुक्त विद्यमाने दुभंगलेले ओठ व टाळू (क्लेफ्ट लिप व क्लेफ्ट पॅलेट) असलेल्या रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया व उपचार शिबिर ५ ते ७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरात रुग्णांची प्राथमिक तपासणी, शस्त्रक्रिया, मार्गदर्शन, औषधोपचार तसेच रुग्णालयातील निवास आणि दोन वेळचे भोजन पूर्णपणे विनामूल्य दिले जाणार आहे. नवीन रुग्णांसह पूर्वी शस्त्रक्रिया झालेले रुग्णदेखील तज्ज्ञांकडून तपासणीस पात्र असतील. तपासणी प्रक्रिया ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता हॉस्पिटलच्या प्लास्टिक सर्जरी विभाग (ओपीडी क्र. ५A) येथे सुरू होईल. रुग्णांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या उपक्रमाबाबत प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील यांनी सांगितले की, “मिशन स्माईलसोबतच्या सहकार्यामुळे क्लेफ्ट लिप व पॅलेट असलेल्या बालकांना जागतिक दर्जाची आणि करुणामय सेवा देण्याची आमची बांधिलकी अधिक बळकट झाली आहे.”

हेही वाचा       :          तरुणांसाठी उद्योजकतेचे नवे दालन! 

विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पी. पाटील म्हणाले, “या प्रकल्पाद्वारे जन्मजात विकृतींवर लक्ष केंद्रीत करत आम्ही रुग्णांना उच्च दर्जाची आणि परिणामकारक सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशा शस्त्रक्रिया केवळ हास्य परत देत नाहीत, तर उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवतात.”

अधिष्ठाता डॉ. रेखा आर्कोट यांनी म्हटले की, “अनेक बालकांसाठी क्लेफ्ट शस्त्रक्रिया म्हणजे स्पष्ट बोलणे, योग्यरीत्या अन्नग्रहण आणि समाजात आत्मविश्वासाने वावरण्याची नवी संधी आहे. या उपक्रमात सहभागी तज्ज्ञ पथकाचे योगदान मोठे आहे.”

प्लास्टिक सर्जरी विभागप्रमुख डॉ. गुरुस्वामी विश्वनाथ यांनी सांगितले, “क्लेफ्ट विकृती रुग्णांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक जीवनावर परिणाम करतात. या शिबिराद्वारे आम्ही आर्थिक परिस्थितीची अट न घालता उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देत आहोत.”

सहाय्यक प्राध्यापक डॉ. पूजा दांडेकरी* यांनी सांगितले, “क्लेफ्ट विकृती असलेल्या बालकांसाठी लवकर हस्तक्षेप अत्यंत महत्त्वाचा आहे. या उपक्रमामुळे रुग्णांचा आत्मविश्वास वाढण्यास आणि जीवनमान उंचावण्यास मदत होते.”या मोफत शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांनी सहभागी होऊन अत्याधुनिक वैद्यकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button