Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

फराह खान की रितेश देशमुख… लॉकअप 2साठी कोणाला किती मानधन मिळाले?

Lock Upp 2 Host Fees : नेटफ्लिक्सवरील रिअॅलिटी शो ‘लॉक अप’चा दुसरा सीजन सुरू होताच चर्चेत आला आहे. यावेळी कंटेस्टंट्सच्या ड्रामासोबत नवीन होस्ट्सनी देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या सीजनला बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शक फराह खान आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी एकत्रपणे होस्ट केले आहे. दोघांची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मात्र, दोघांची फीस किती आहे, याबाबत सध्या मोठी चर्चा रंगली आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, फराह खानला ‘लॉक अप २’च्या प्रत्येक एपिसोडसाठी १५ लाख ते २५ लाख रुपये इतकी मोठी रक्कम दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या फीसबाबत फराह खान किंवा शोच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. तरीही ही आकडेवारी सोशल मीडियावर आगीप्रमाणे पसरली आहे. फराह खानचा रिअॅलिटी शोजशी जुना संबंध आहे. त्यांनी ‘बिग बॉस’, ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाड़ी’, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ आणि ‘इंडियन आयडॉल’ सारख्या मोठ्या शोजमध्ये होस्टिंग किंवा जजिंग केले आहे. त्यांच्या या अनुभवामुळे निर्मात्यांनी त्यांना इतकी मोठी फी देण्याचे ठरवले असावे.

हेही वाचा –  ‘फनेल झोन आणि मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन निर्बंध बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला गती द्या’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रितेश देशमुखने यापूर्वी ‘बिग बॉस मराठी’चे होस्टिंग केले आहे. त्यांच्या फीचा नेमका आकडा अद्याप समोर आला नसला तरी, रिपोर्ट्सनुसार त्यांना फराह खानच्या बरोबरीने किंवा त्याहून अधिक फी मिळत असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, रितेश देशमुखला प्रत्येक एपिसोडसाठी ३० ते ४० लाख रुपये मिळत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

फराह खानच्या तुलनेत रितेश देशमुखचा रिअॅलिटी शो होस्ट करण्याचा अनुभव कमी असला तरी, ‘बिग बॉस मराठी’मध्ये त्याच्या होस्टिंग स्टाइलची प्रेक्षकांनी भरभरून प्रशंसा केली होती. कंटेस्टंट्सशी संवाद साधण्याची आणि परिस्थिती हाताळण्याची त्याची पद्धत आवडली. यामुळे ‘लॉक अप २’च्या निर्मात्यांनी त्याला फराह खानसोबत कास्ट केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button