तरुणांसाठी उद्योजकतेचे नवे दालन!
अनुराधा दिपक साळुंके यांचा स्तुत्य उपक्रम

प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोफत कौशल्य विकास उपक्रम
पिंपरी | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील उच्चशिक्षित अनुराधा दीपक साळुंके यांनी या परिसरातील तरुणांसाठी उद्योजकतेचे नवे दालन खुले केले आहे. तरुणांनी आगामी काळात रोजगाराच्या संधी शोधत भटकण्यापेक्षा कौशल्य विकास उपक्रमातून उद्योग व्यवसायाच्या क्षेत्राकडे वळावे आणि स्वावलंबी व्हावे असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी युवक युवतींना उद्योग क्षेत्राकडे वळा असा असे आवाहन देखील केले आहे.
अनुराधा दिपक साळुंके यांनी मास्टर ऑफ आर्ट्स पदवी प्राप्त केली असून सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत आहे . याबाबत बोलताना अनुराधा साळुंके म्हणाल्या देशसेवा आणि समाजाच्या प्रगतीची भावना मनात ठेवून मी सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे . या प्रवासात माझे पहिले उद्दिष्ट आहे की प्रभाग क्रमांक 3 मधील तरुण तरुणींनी रोजगाराच्या शोधात भटकण्याऐवजी उद्योग व्यवसायाच्या क्षेत्राकडे वळावे आणि स्वावलंबी व्हावे. यासाठी आगामी काळात त्यादृष्टीने पर्यन्त करणार आहेत.
माझा संकल्प हेच माझे उदिष्ट
1.तरुणांना उद्योगाकडे वळवण्याचा संकल्प
आजच्या काळात शिक्षण आणि कौशल्य यांची सांगड घातली तर प्रत्येक तरुण स्वतःचा व्यवसाय उभारू शकतो मात्र माहितीचा अभाव आणि योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक तरुण मागे पडतात यासाठी मी प्रभागातील प्रत्येक इच्छुक युवक युवतीला योग्य दिशा दिली जाईल यासाठी प्रयत्नशील आहे.
हेही वाचा : WPL 2026चे वेळापत्रक जाहीर; ९ जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात, अंतिम सामना ५ फेब्रुवारीला
2. महामंडळांच्या योजनांची माहिती आणि मार्गदर्शन
महाराष्ट्र शासनाने विविध समाजांसाठी वेगवेगळी महामंडळे स्थापन केली आहेत. ज्यांच्यामार्फत शैक्षणिक कर्ज व्यवसाय कर्ज आणि आर्थिक मदत मिळते जाती नुसार कोणते महामंडळ कोणत्या योजना देते त्यासाठी लागणारी प्रक्रिया कोणती कागदपत्रे आवश्यक असतात आणि कर्ज प्रत्यक्षात कसे मिळवायचे याचा सखोल अनुभव मला आहे. त्यामुळे तरुणांना कोणताही गोंधळ न होता प्रभावी मार्गदर्शन मिळेल.
3. मोफत कौशल्य विकास कोर्सेसची घोषणा
प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी रोजगाराभिमुख आणि उद्योगधंद्याशी संबंधित विविध कोर्सेस सुरू करत आहे. विशेष म्हणजे या कोर्सेससाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. गरजू आणि इच्छुक तरुणांपर्यंत कौशल्य पोहोचवणे हेच या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रशिक्षणाद्वारे उद्योजकता व्यवसाय नियोजन भांडवल उभारणी डिजिटल मार्केटिंग उत्पादन व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांवर प्रशिक्षण देण्यात येईल.
4. नोकरी मिळवणारे नाही तर रोजगार देणारे व्हा
आजचा तरुण फक्त नोकरी मिळवणारा न राहता नोकरी निर्माण करणारा बनला पाहिजे समाजाच्या प्रगतीत उद्योजकांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच मी मिशन 5000 उद्योजक राबवत आहे. या मिशनअंतर्गत प्रभाग क्रमांक 3 मधून पाच हजार स्वावलंबी आणि सक्षम उद्योजक घडवण्याचा संकल्प केला आहे.
या उपक्रमाची नोंदणी सुरू असून प्रवेशाची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी दिपक गेणू साळुंके ( +91 91680 02020) यांच्याशी संपर्क साधावा. जागा मर्यादित असल्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकावे आपल्या प्रगतीमुळेच प्रभागाचा आणि राज्याचा विकास साध्य होणार आहे.




