वृद्धाश्रमात ‘रिअल लाईफ रिअल पीपल’तर्फे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शिबिर
भाजयुमो शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणिवेतून “रिअल लाईफ रिअल पीपल” या उपक्रमांतर्गत सावली निवारा केंद्र, वृद्धाश्रम येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांची ओळख करून त्यांच्यावर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आली. समाजातील ज्येष्ठांसाठी आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या या प्रयत्नाचे उपस्थितांनी कौतुक केले.

हेही वाचा : पुनावळे, ताथवडे, वाकड परिसरात ‘उत्सव आनंदाचा-खेळ पैठणीचा!’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण विभागाचे मा. उपायुक्त श्री. संजय कदम साहेब तसेच भाजयुमो शहराचे सचिव श्री. अजित कुलथे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी म्हटले की, “अशा सामाजिक उपक्रमांमुळे तरुणांमध्ये सेवा वृत्ती रुजते आणि समाजाशी जोडलेपण अधिक दृढ होते.”
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. सुमित श्रीकांत घाटे (मंडल अध्यक्ष, भाजयुमो पिंपरी-दापोडी व अध्यक्ष, हिंदू गर्जना प्रतिष्ठान), श्री. राहुल सदाशिव खाडे (सरचिटणीस, भाजयुमो पिंपरी चिंचवड शहर) आणि श्री. सतीश नारायण नागरगोजे (सरचिटणीस, भाजयुमो पिंपरी चिंचवड शहर) यांनी उत्कृष्ट नियोजन करून शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले. या कार्यक्रमाला भाजयुमो पिंपरी चिंचवड शहराचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम ८ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत, पिंपरी मार्केटकडे जाताना लालबहादूर शास्त्री पतसंस्था मागे, पिंपरी (पुणे-१८) येथे पार पडला.
“समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवा पोहोचवणे हेच आमचे खरे ध्येय आहे. वृद्धांच्या डोळ्यातील प्रकाश टिकवून ठेवणे हीच आमच्यासाठी खरी भेट आहे. तरुणाईने समाजसेवेची जबाबदारी अंगीकारली, तर प्रत्येक घरात आनंद आणि सुरक्षितता येईल. अशा उपक्रमांतून आम्ही तीच भावना जिवंत ठेवतो.”
– दिनेश यादव, शहराध्यक्ष, भाजयुमो पिंपरी चिंचवड.




