Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

भाजपा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी मिळताच आमदार महेश लांडगे ‘‘ऑनफिल्ड’’

उत्तर पुणे जिल्हा मोर्चाबांधणी: आळंदी, राजगुरूनगर, चाकण, मंचर, जुन्नर, शिरुर नगर परिषदांसाठी बैठकांचा सपाटा

पुणे । विशेष प्रतिनिधी । आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने जिल्हा निवडणूक प्रभारी आणि प्रमुख यांची नियुक्ती केली. पुणे जिल्ह्यात भाजपा संघटनात्मक संरचनेप्रमाणे उत्तर पुणे जिल्हा (मावळ)मध्ये ‘जिल्हा निवडणूक प्रमुख’ म्हणून आमदार महेश लांडगे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार लांडगे यांनी आढावा बैठकांचा सपाटा लावला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेनुसार, पुणे जिल्ह्याचे विभाजन पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, उत्तर पुणे आणि दक्षिण पुणे चार संघटनात्मक जिल्ह्यांत केले जाते. उत्तर पुणे जिल्ह्यात आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, शिरुर, हवेली या सहा तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये 7- नगरपरिषदा आहेत. ज्यामध्ये लोणावळा, तळेगाव, चाकण, राजगुरूनगर शिरुर, आळंदी, जुन्नर या नगरपरिषदांचा समावेश आहे. 2- नगर पंचायती आहेत. यामध्ये मंचर आणि वडगावचा समावेश आहे. तसेच, 6- पंचायत समिती आहेत. यामध्ये आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, शिरुर, हवेली यांचा समावेश आहेत.

विशेष म्हणजे, 6- तालुके उत्तर पुणे जिल्ह्यात येतात. त्यामध्ये आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, शिरुर, हवेलीचा समावेश आहे. 41- जिल्हा परिषदचे गट आहेत. त्यामध्ये आंबेगाव – 5, जुन्नर- 8 , खेड-8 , मावळ-5, शिरुर-8, हवेली- 6/7 अशा गटांचा समावेश आहे. तसेच, 76 पंचायत समिती गण संख्या आहे.

आमदार लांडगे म्हणाले की,  भाजपाचा प्रत्येक सदस्य, कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी थेट नागरिकांपर्यंत पोहोचून भाजपाचा ‘‘विकासाभिमूख हिंदुत्व’’ हा विचार घराघरात पोहोचवावा. ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही पट्ट्यांमध्ये विकासाची गती अधिक वाढविणे, हेच आपले पुढील लक्ष्य आहे. त्यासाठी भाजपाला विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रत्येकाने जोमाने कामाला लागावे, असे आवाहन आढावा बैठकीमध्ये केले आहे. ‘‘ही निवडणूक केवळ एखाद्या उमेदवाराची नाही, तर प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आणि योगदानाचे प्रतिबिंब आहे’’ ही भूमिका अधोरेखित केली. भाजपाचा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया आणि “सबल भारत, सक्षम महाराष्ट्र अन्‌ समृद्ध पुणे जिल्हा” या ध्येयाने पुढे जाऊया!… असा आमचा निर्धार आहे.

जिल्हा निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ यांची आढावा बैठक…

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर “पुणे जिल्हा निवडणूक प्रभारी” म्हणून केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या संघटनात्मक रचनेनुसार उत्तर पुणे जिल्हा व दक्षिण पुणे जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारी यांची प्राथमिक समन्वय बैठक पार पडली. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे. पुणे ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष  प्रदीप कंद, पुणे ग्रामीण दक्षिणचे जिल्हाध्यक्ष  शेखर वढणे, आमदार राहुल कुल, माजी आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार संजय जगताप, प्रविण माने उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मेहनतीच्या जोरावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे “व्हिजन” तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून भारतीय जनता पार्टीला शत प्रतिशत यश मिळवण्याचा संकल्प भाजपाने केला आहे.
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button