पुनावळे, ताथवडे, वाकड परिसरात ‘उत्सव आनंदाचा-खेळ पैठणीचा!’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
भाजपाचे राहुल काटे यांचा पुढाकार: महिलांच्या कलेला व गुणांना मिळाले व्यासपीठ

पिंपरी-चिंचवड | महिला भगिनींच्या कला, गुण आणि सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपाचे श्री. राहुल काटे यांच्या पुढाकाराने ‘उत्सव आनंदाचा – खेळ पैठणीचा!’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजनाने झाली. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी वैद्य (रेणुका फेम – लक्ष्मी सिरियल) यांनी उपस्थित राहून महिलांचे मनोबल वाढवले. या स्पर्धेत विजेत्यांना टीव्ही, फ्रिज, गॅस शेगडी, मिक्सर, इलेक्ट्रिक शेगडी अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. महिलांनी उत्साहात सहभाग घेत विविध कलागुणांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. शंकर जगताप यांचे निष्ठावंत सहकारी राहुल काटे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपा अध्यक्ष शत्रुघ्न (बाप्पू) काटे यांच्या शुभहस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
हेही वाचा : आयपीएलमधील सर्वात मोठा ट्रेड? संजू सॅमसन चेन्नईकडे जाण्याची शक्यता
या प्रसंगी कृषिनिष्ठ पुरस्कार विजेते सुनील ढवळे, भाजपा शहर वरिष्ठ उपाध्यक्ष काळूराम बारणे, भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर, मंडल अध्यक्ष भाजपा प्रसाद कस्पटे, RPI शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, युवा नेते चेतन पवार, विजय दगडे, श्रीराम मंदिर पुनावळेचे विश्वस्त ज्ञानदेव काटे, विजय दर्शले, शुभम भुजबळ, नितीन दर्शले, अमित दर्शले, किशोर चित्राव, अशोक कटयारे तसेच प्रभाग क्र. २५ मधील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सोसायट्यांचे चेअरमन, सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करून महिलांना प्रोत्साहन देणारे राहुल काटे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

“महिलांचे सामर्थ्य ओळखून त्यांना संधी दिली, तर प्रत्येक समाज उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करतो. “हा खेळ केवळ पैठणीचा नाही, तर महिलांच्या आत्मविश्वासाचा, कलेचा आणि आनंदाचा उत्सव आहे.सेवा आणि सन्मान यांची सांगड घातली, की समाजातील प्रत्येक घर आनंदाने उजळून निघते.”
– राहुल काटे, सामाजिक कार्यकर्ते, भाजपा.





