पिंपरी / चिंचवड

जिल्हा क्रीडा अधिका-याची दीड लाखांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी
‘तुम्ही लकी ड्रॉ ग्राहक असून तुम्हाला आठ लाख 80 हजार रुपये मिळणार असल्याची बतावणी करून जिल्हा क्रीडा अधिका-याची एक लाख 53 हजार 400 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 11 ते 22 जानेवारी 2022 या कालावधीत म्हाळुंगे गावठाण येथे घडली.

सुयश नारायण जाधव (वय 28, रा. म्हाळुंगे गावठाण) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 26) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नापतोल प्रा ली दिल्ली या कंपनीतील सिनियर मॅनेजर उपेंद्र लहरे असे नाव सांगणारा 9163299288 या क्रमांकावरून बोलणा-या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत. आरोपीने नापतोल या कंपनीच्या नावाखाली फिर्यादी यांना फोन केला. ‘तुम्ही लकी ड्रॉ ग्राहक असून तुम्ही आमच्या कंपनीकडून आठ लाख 80 हजार रुपये लकी ड्रॉ रक्कम जिंकली आहे. ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची बतावणी केली. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून एक लाख 53 हजार 400 रुपये गुगल पेद्वारे आरोपीने घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खारगे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button