मेफेड्रॉन ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी चौघांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/GANG-ARREST-696x447-1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
मेफेड्रॉन ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 26) दुपारी ताथवडे येथे करण्यात आली.
उमेद मोह्जम शेख (वय 21, रा. पिंपरी), निहाल रसउल्ला शेख (वय 21, रा. पिंपरी), अब्दुल कादिर सय्यद (वय 23, रा. पिंपरी), अमित तलाराम भाटे (वय 25, रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र कुरणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून त्याच्या ताब्यात मेफेड्रॉन ड्रग्ज बाळगले. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता ताथवडे येथे कारवाई करून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मेफेड्रॉन ड्रग्ज, दोन दुचाकी असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.