Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
शहराच्या तापमानात चढ उताराची शक्यता

पिंपरी : चिंचवड येथे रविवारी (दि.2)37.0 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून, येत्या आठवडाभरात यामध्ये घट व वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दुपारच्या सापेक्ष आर्द्रता घट होईल. हवामान उष्ण आणि कोरडे राहण्याचीदेखील शक्यता वर्तविली आहे. तसेच उष्ण वारे वाहण्यामुळे दुपारी तापमानात वाढ होऊन उष्ण हवामान जाणवेल.
हेही वाचा – कालव्यालगतची अतिक्रमणे तात्काळ काढा,अजित पवारांचे महापालिका प्रशासनास आदेश
पुढील आठवडाभरात कमाल तापमान सांगली व सातारा जिल्ह्यांत 35 अंश सेल्सिअस, कोल्हापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत 36 अंश सेल्सिअस व सोलापूर जिल्ह्यात 38 अंश सेल्सिअस राहील.
चिंचवडमध्ये किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअसदरम्यान राहणार आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत 31 ते 39 टक्के राहील.