breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रुग्णालयांची ‘फायर एनओसी’ प्रक्रिया होणार सुलभ!

आयुक्त शेखर सिंह यांचे डॉक्टर संघटनांना आश्वासन

आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने महत्वपूर्ण बैठक

पिंपरी :  पिंपरी-चिंचवडमधील वैद्यकीय क्षेत्रात व्यावसाय करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालयांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय अडचणी व समस्यांबाबत महानगरपालिका प्रशासन सकारात्मक कार्यवाही करेल. तसेच, फायर ऑडीट एनओसी, बायोमेडिकल वेस्ट आणि हॉस्पिटल रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुलभ करण्यात येईल, असे अश्वासन महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटना आणि प्रतिनिधी यांची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, वैद्यकीय विभागाचे लक्ष्मण गोफणे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक ऑटो क्लस्टर येथे घेण्यात आली.

यावेळी आयुर्वेद संघटनेचे वैद्य निलेश लोंढे, पिंपरी-चिंचवड निमाचे अध्यक्ष डॉ. प्रताप सोमवंशी, सत्यजित पाटील, विमा पिंपरी-चिंचवडचे सेक्रेटरी संगीता गायकवाड, पिंपरी-चिंचवड प्रायव्हेट हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश भोईर, आयुर्वेद फोरम निमाचे अध्यक्ष डॉ. अर्चना गोरे, ‘एफडीए’ चे डॉ. खेमचंद सरडे, भोसरी डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. चंद्रकांत राऊत, दिघी डॉक्टर्स असोसिएशन अध्यक्ष डॉ. महेश भारती, खजिनदार डॉ. दिपक शेलार, मोशी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमृत पेरणे, डेंटल असोसिएशनचे डॉ. अतुल पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा –  बांग्लादेशातील हिंदू, संविधान, समान नागरी कायदा, याबद्दल पीएम मोदींच महत्त्वाच भाष्य

बैठकीत चर्चा झालेले महत्त्वपूर्ण विषय :

1. रुग्णालयालयांना फायर ऑडीट एनओसी खासगी संस्थांकडून बी-फॉर्मद्वारे हॉस्पिटल रजिस्टेशन करण्याची प्रक्रिया सुलभ होईल.
2. बायोमेडिकल वेस्टसाठी ३ वर्षांचे शुल्क भरल्यावर पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर सवलत मिळण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
3. हॉस्पिटलचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सबमिट केल्यानंतर त्याची ॲकनॉलेजमेंट देण्यात येईल. त्यामुळे इन्शुरन्सचे काम अडून राहणार नाही. हॉस्पिटल रजिस्टेशन प्रक्रिया सुलभ व जलद करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.

शहरात आता आयुर्वेद व पंचकर्म रुग्णालय…

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरात आयुर्वेद व पंचकर्म रुग्णालय सुरू करावे, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी वैद्यकीय विभागाने जागेची चाचपणी करावी. त्यानुसार प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनाने समाविष्ट गावांमध्ये सदर रुग्णालय सुरू करावे, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी बैठकीत केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. महानगरपालिका रुग्णालयांमध्ये सक्षमपणे आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. पण, खासगी डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संघटना यांचेही शहराचे नागरी आरोग्य संवर्धन करण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना येणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्याबाबत प्रशासनाला सूचना केली आहे. शहरात आता आयुर्वेद रुग्णालय व पंचकर्म सेंटर उभारले जात आहे, ही बाब स्वागतार्ह आहे.

-महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button