breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सोसायटीधारकांचे नळ कनेक्शन तोडण्यास फेडरेशनचा विरोध

महापालिका प्रशासनाची आडमुठी भूमिका

तपासणी न करताच कारवाई केल्याचा आरोप

पिंपरी : पिंपरीचिंचवड महापालिका प्रशासनाकडून शहरातील ४१ सहकारी गृह रचना संस्थांना त्यांचे STP ( मैला शुद्धीकरण आणि पाणी पुनर्वापर प्रकल्प ) बंद असल्याने सोसायटीचे पाण्याचे नळ कनेक्शन तोडण्याच्या एकतर्फी निर्णयाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी सोसायटीधारकांनी केली आहे.

याबाबत चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त-2 यांनी वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार तसेच शहरातील ४१ सहकारी गृहरचना संस्थांना दिलेल्या नोटिसीनुसार या ४१ सहकारी गृह रचना संस्थांचे मैला शुद्धीकरण आणि पाणी पुनर्वापर केंद्र ( STP) बंद असल्याने सदरील सोसायट्यांचे पाण्याचे नळ कनेक्शन कट करण्याबाबत सुचवलेले आहे. आपला हा निर्णय एकतर्फी आहे.

हेही वाचा  –  मनोज जरांगेंचा एकेरी उल्लेख करत छगन भुजबळांवर हल्लाबोल; म्हणाले..

संबंधित ४१ सोसायट्यांच्या बांधकाम व्यवसायिकांनी सदर गृहप्रकल्पामध्ये बसवलेले एस.टी.पी. अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. तसेच विकसकाकडून सोसायटी हस्तांतरण करत असताना सदरील एसटीपी ह्या चालू अवस्थेत नव्हत्या. फक्त याच ४१ सोसायट्यांच्या नव्हे, तर पिंपरी-चिंचवड शहरातील बऱ्याच सोसायट्यांमधील एसटीपी विकसकाकडून सोसायटी हस्तांतरण करत असताना बंद असतात त्या चालू अवस्थेत नसतात, तरी त्या आमच्या सोसायटीधारकांच्या माथी मारल्या जातात. शहरातील ९० टक्के गृहप्रकल्पामध्ये एसटीपी प्रकल्प कार्यान्वित नसताना देखील आपल्या बांधकाम विभागाकडून पार्ट कंम्प्लिशन , (भाग पूर्णत्वाचा दाखला) दिला जातो. याबाबत आमच्या फेडरेशन मार्फत आपणाला वेळोवेळी लिखित तक्रारी देखील केलेल्या आहेत या सर्व गोष्टी आपल्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. तरी पण आपण शहरातील बांधकाम व्यवसायिकांना पाठीशी घालत यावर कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही, असा दावा फेडरेशनने केला आहे.

बैठकीतील निर्णयांवर अंमलबजावणी नाही..

आयुक्तांच्या दालनात 30 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमधील चर्चेनुसार आमच्या फेडरेशन कडून दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी जावक क्र.241/ 23 हे पत्र दिले होते आणि या पत्रामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील 30 बांधकाम व्यवसायिकांच्या अनियमित, चुकीच्या कामाबद्दल तसेच निकृष्ट दर्जाच्या एसटीपी बसलेल्या असल्या बद्दल तक्रार केली होती यावर देखील आपण आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला बांधकाम व्यवसायिकांनी जोपर्यंत भामा आसखेडचा टप्पा क्रमांक पाच आणि सहा पूर्ण होत नाही तोपर्यंत हे बांधकाम व्यवसायिक स्वखर्चाने पाणी पुरवतील अशा लिहून दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन केल्यामुळे भारतीय दंड संहिता कलम 200 प्रमाणे यांच्यावर देखील कारवाई करण्याची तक्रार आम्ही केली होती. परंतु यावर देखील आपल्याकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.

पिंपरी-चिंचवड शहरातील बरेच बांधकाम व्यवसायिक त्यांच्या गृहप्रकल्पामध्ये बसवत आलेल्या एस.टी.पी यंत्रणा या अतिशय निकृष्ट दर्जाच्या असतात. UDCPR मधे अट आहे ,एक नियम आहे म्हणून फॉर्मलिटी म्हणून त्या बसवल्या जातात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून याची कोणत्याही प्रकारची तपासणी न करता सदर गृहप्रकल्पांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले जातात. मनपाच्या पर्यावरण विभागाकडून सोसायट्यांमधील या एसटीपी यंत्रणेबाबत कोणतीही पाहणी न करता विकसकांना ना हरकत दाखला (NOC) दिल्या जातात या सर्वांबाबत मनपाच्या माननीय आयुक्तांना आमच्या फेडरेशन मार्फत वारंवार लिखित तक्रारी करून देखील आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना आणि बांधकाम व्यवसायिकांना पाठीशी घेतली जाते. जोपर्यंत वरील या सर्वांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत आम्ही कोणत्याही सोसायटीमधील पाण्याचे नळ कनेक्शन कट करू देणार नाही.

संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button