एचए मजदूर संघाच्या अध्यक्षपदी खासदार मेधा कुलकर्णी यांची निवड

पिंपरी : पिंपरीतील हिंदुस्तान ॲन्टीबायोटिक्स (एचए) मजदूर संघाच्या अध्यक्षपदी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे स्वागत होत आहे.
हिंदुस्तान ॲन्टीबायोटिक्स हा केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असल्याने, केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असल्याने, या कारखान्याशी संबंधित असलेले प्रश्न, समस्या व अन्य बाबींवर थेट संसदेत प्रश्न उपस्थित करणे सोयीचे ठरावे, याकरिता या संघटनेच्या अध्यक्षपदी खासदारांची निवड करण्याची प्रथा आहे.
हेही वाचा – मविआ’चा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढणार
आतापर्यंत खासदार आर. के. खाडीलकर, खासदार अनंतराव पाटील, खासदार मोहन धारिया, खासदार बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, खासदार संभाजीराव काकडे, खासदार नानासाहेब नवले, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व खासदार श्रीरंग बारणे यांनी या संघटनेचे नेतृत्व केले आहे.





