व्यक्तीविशेष: डॉ. बाळासाहेब वाफरे यांना ‘नोबेल रिसर्च अवॉर्ड’
शिक्षण विश्व: जागतिक पातळीवर भारतीय गणित संशोधनाची दखल

पुणे | एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी (देवाची) येथील प्राचार्य व प्रख्यात गणितज्ञ डॉ. बाळासाहेब वाफरे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला आहे. सायंटिफिक लॉरेल्स या जगप्रसिद्ध वैज्ञानिक संस्थेने त्यांना गणित क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन, शैक्षणिक नेतृत्व व उच्च शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल ‘नोबेल रिसर्च अवॉर्ड’ प्रदान केला आहे.
सायंटिफिक लॉरेल्स ही संस्था विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करते. जगभरातील नामांकित वैज्ञानिक, संशोधक व व्यावसायिक या संस्थेचा भाग आहेत. संस्थेचे उद्दिष्ट वैज्ञानिक प्रगतीला गती देणे आणि उत्कृष्टतेची दखल घेणे हे आहे.
डॉ. वाफरे यांचा दांडगा अनुभव
डॉ. वाफरे यांना ३२ वर्षांचा अध्यापन व २५ वर्षांचा संशोधनाचा अनुभव असून, विविध नामवंत संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. सध्या ते एमआयटी आळंदी (दे.) येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बीसीयूडी अंतर्गत संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, अणुऊर्जा विभागाच्या अनुदानासह “इंटिग्रल ट्रान्सफॉर्म्स आणि त्यांचे अनुप्रयोग समाविष्ट करणारे स्यूडोडिफरेंशियल टाइप ऑपरेटर” या विषयावर ₹१६.८ लाखांचे संशोधन यशस्वीपणे पार पाडले आहे.

हेही वाचा : ग्राहकांच्या दबावामुळे ICICI बँकेने किमान शिल्लक रकमेचा निर्णय बदलला, नवीन नियम काय?
संशोधन व पुरस्कारांचा ठसा
डॉ. वाफरे यांनी १३५ हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन लेख प्रकाशित केले असून, त्यांना मिळालेली काही महत्त्वाची पारितोषिके पुढीलप्रमाणे:
- बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड – इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी (२०११)
- भारत शिक्षण रत्न पुरस्कार (२०१२)
- लाइफटाईम एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड (२०१३)
- ग्लोबल टीचर रोल मॉडेल अवॉर्ड (२०१५)
- हिंद रत्न पुरस्कार – हाउस ऑफ कॉमन्स, लंडन (२०१९)
- बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड – IAMRF (२०२३)
- आउटस्टँडिंग लीडर इन हायर एज्युकेशन – Elets (२०२४)
- लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड – VDGOOD (२०२३)
सामाजिक आणि शैक्षणिक योगदान
- विविध संशोधन नियतकालिकांचे संपादक मंडळ सदस्य
- PH.D मार्गदर्शक व परीक्षक
- ९० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग
- एनएएसी मानांकन, रक्तदान शिबिरे, व भारत अस्मिता नॅशनल अवॉर्ड्स सारख्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग
- २०२३ मध्ये IOASD कडून रॉयल फेलो किताब
- भारतीय गणित संशोधनाचा अभिमान
डॉ. वाफरे यांना मिळालेला ‘नोबेल रिसर्च अवॉर्ड’ हा केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी गौरवाचा क्षण आहे. त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळत राहील, आणि भारतीय गणित संशोधनाचे नाव जागतिक नकाशावर ठळकपणे उमटत राहील.
संशोधन ही केवळ माहितीची वाढ नसून, ती ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याची एक सततची प्रक्रिया आहे. गणितासारख्या अमर्याद विषयातून नव्या शक्यतांचा शोध घेणे हेच माझे ध्येय आहे – विद्यार्थ्यांसाठी, संस्थेसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी.
– डॉ. बाळासाहेब वाफरे, प्राचार्य.




