Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

DP For Pimpri-Chinchwad : रावेतला मिळणार नवी ओळख; नवीन आराखड्यामध्ये ‘‘रिव्हर फ्रँट गार्डन’’

‘ग्रीन सिटी क्लिन’ चा संकल्प : रावेतमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अन्‌ शॉपिंग सेंटरचे आरक्षण

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व नगर रचना विभागाने प्रसिद्ध केलेल्या नवीन प्रारुप सुधारित विकास आराखड्यामध्ये रावेतला नवीन ओळख मिळणार आहे. रावेतचा भौगोलिक वारसा असलेल्या पवना नदीच्या बाजुने ‘‘रिव्हर फ्रंट गार्डन’’ विकसित होणार आहे. पिंपळे सौदागर येथे लिनिअर गार्डन विकसित केले. त्याच धर्तीवर सदर गार्डन ही रावेत आणि परिसरातील नागरिकांना पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

महानगरपालिका प्रशासनाने सुधारित प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यावर सर्वसामान्य नागरिकांना हरकती आणि सूचना मांडण्याची संधी देण्यात आली. 2031 पर्यंत शहराची अपेक्षीत लोकसंख्या, शहराची गरज लक्षात घेवून विकास आराखडा अंतिम करण्यात येत आहे. शहरातील 28 गावांचा या आराखड्यामध्ये समावेश आहे.

पुणे- मुंबई महार्गालगत असलेल्या रावेत परिसराचा गेल्या 20 वर्षांमध्ये झपाट्याने विकास झाला. जुन्या डीपीमध्ये रावेत परिसरासाठी एकूण 44 आरक्षणे आहेत. त्यापैकी विकसित झालेली आरक्षणे वगळता सर्व आरक्षणे जैसे थे ठेवण्यात आली आहेत. आरक्षण क्रमांक 4/79 मध्ये स्मशानभूमी प्रस्तावित होती. त्याठिकाणी स्माशनभूमीसह ‘रिव्हर फ्रंट गार्डन’ विकसित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, सुमारे 11 हजार स्वेअर मीटर क्षेत्रात सदर आरक्षण प्रस्तावित केले आहे. त्यामुळे रावेत, किवळे आणि मामुर्डी भागातील नागरिक आणि सोसायटीधारकांना पर्यटनासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

यासह नवीन डीपीमध्ये रावेतमध्ये दोन प्ले ग्राउंड, दोन शॉपिंग सेंटर आणि मार्केट, पार्किंग, कम्युनिटी सेंटर आणि लायब्ररी, तीन गार्डन, दोन प्रायमरी स्कूल, रिटेल मार्केट, पार्किंग आणि ई-व्ही. चार्जिंग स्टेशन, टाउन हॉल, डिस्पेंसरी आणि मॅटर्निटी होम अशी आरक्षणे आहेत.

बेघरांसाठी रावेत मध्ये घराची संधी…

नवीन विकास आराखड्यामध्ये महापालिका प्रशासनाने इकॉनॉमिकली विकर सेक्शन हाउसिंग सुमारे 16 हजार 400 चौरस मीटर क्षेत्रावर आणि हाऊसिंग फॉर डिसहाउस्ड म्हणजे निराधारांसाठी घर असे सुमारे 18 हजार 500 चौरस मीटर क्षेत्रावर आरक्षण विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे रावेत सारख्या प्रशस्त परिसरात घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी बेघर आणि आर्थिक दुर्बल घटनकांना उपलब्ध होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button