पिंपरी / चिंचवड

काठीने मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

काठीने मारून श्वानाला ठार मारले. याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 4) सकाळी सव्वा नऊ वाजता एमआयडीसी भोसरी येथे घडली.

शिवम श्रीकांत कोळी (वय 18, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल साहेबराव कानडे (वय 30, रा. एमआयडीसी भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सव्वानऊ वाजता फिर्यादी, त्यांची मैत्रीण नेहा वर्मा, मित्र साहिल शेख असे दुचाकीवरून भोसरी येथून डी वाय पाटील कॉलेजकडे जात होते. महात्मा फुले नगर येथील नाल्याजवळ आले असता आरोपी अनिल कानडे हा एका श्वानाच्या पाठीमागे पळत असल्याचे दिसले. अनिल याने श्वानाला काठीने मारून ठार मारले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button