बॉक्सिंग स्पर्धेत धीरा माने सुवर्णपदकाची मानकरी
शिक्षण विश्व: एम एम विद्यालयच्या लौकिकात मानाचा तुरा!

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड संघातील खेळाडू धीरा माने हिने पुण्यातील जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम येथे पार पडलेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत 66 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारावर आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अलिबाग येथे तिची निवड झाली आहे.
धीरा माने सध्या थेरगाव येथे घेतले असून सध्या एम एम विद्यालय काळेवाडी येथे ती बारावी वर्गात शिक्षण घेत आहे. शिक्षण आणि खेळ यांचा समतोल राखत सातत्याने मेहनत घेतल्याने तिने हा यशाचा टप्पा गाठला आहे. सलग तीन वेळा राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान तिला मिळाला आहे.सध्या ती मार्गदर्शक यशवंत माने आणि संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. स्पर्धेदरम्यान क्रीडा शिक्षक हराळे तसेच मार्गदर्शक वचकल आणि गिरीजा यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा – उद्यानांत अनुभवता येणार राज्यांची संस्कृती ; पुणे महापालिकेची नवकल्पना
कौतुकाचा वर्षाव !
एम एम विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच क्रीडा शिक्षक हराळे यांनी तिच्या कामगिरीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. धीरा माने हिच्या मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे गावातील शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनीही तिच्या कामगिरीचा गौरव केला आहे.




