Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांना मिळाले स्वच्छतेचे धडे!

शिक्षण विश्व: प्रियदर्शनी स्कूलतर्फे मोशी येथे स्वच्छता जनजागृती मोहीम

पिंपरी चिंचवड : प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने  विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वच्छता जनजागृती मोहीम राबविण्यात आली. लहान वयातच स्वच्छतेचे संस्कार रुजावेत, यासाठी  विद्यार्थ्यांशी संवाद साधत वैयक्तिक स्वच्छता, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकचा कमीतकमी वापर आणि शाळा तसेच परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व सविस्तर समजावून सांगितले.

या मार्गदर्शन सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी अनेक प्रश्न विचारत उत्साहाने सहभाग नोंदवला. पालिकेच्या यांच्यावतीने ‘ओला व सुका कचरा वेगळा करा’, ‘स्वच्छता राखा – रोगांपासून दूर राहा’ आणि ‘स्वच्छ परिसर म्हणजे निरोगी शहर’ हे संदेश विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढताना दिसली.

हेही वाचा –  बॉक्सिंग स्पर्धेत धीरा माने सुवर्णपदकाची मानकरी

शाळेच्या मुख्याध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, “विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मुलांना दिलेला स्वच्छतेचा संदेश त्यांच्या दैनंदिन सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवेल याची आम्हाला खात्री आहे. स्वच्छ विद्यार्थी म्हणजे स्वच्छ कुटुंब आणि अखेरीस स्वच्छ शहर हेच या मोहिमेचे खरे यश आहे.”

विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव

पीसीएमसीच्या या उपक्रमामुळे शाळेतील वातावरणात उत्साह निर्माण झाला असून विद्यार्थ्यांना शाळेसोबतच आपल्या घरगुती आणि सामाजिक परिसरातही स्वच्छता राखण्याची प्रेरणा मिळाली. शहर स्वच्छ राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची असल्याचा संदेश ह्या मोहिमेद्वारे प्रभावीरीत्या पोहोचला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button