Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

उद्यानांत अनुभवता येणार राज्यांची संस्कृती ; पुणे महापालिकेची नवकल्पना

पुणे :  पुणेकरांसह देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती एका ठिकाणी अनुभवता यावी, यासाठी पुणे महापालिका देशातील २९ राज्यांच्या संस्कृतीवर आधारीत उद्याने उभारण्याचा आराखडा तयार करत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. शहरातील अनेक उद्याने जुनी झाल्याने ती पुनर्विकसित करण्याचे कामही सुरू असून, ही उद्याने अनोख्या संकल्पनेवर उभारण्यासाठी शहरातील कला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.

सध्या, महापालिकेची २२० पेक्षा अधिक उद्याने असली तरी अत्यल्प उद्यानेच वेगळ्या संकल्पनांवर आधारीत असल्याने पर्यटकांची गर्दी त्या ठराविक ठिकाणीच होते. शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे आणि मुख्य चौकांचे सुशोभीकरण करण्याचे निर्देशही आयुक्तांनी बैठकीत दिले. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘नवीन श्रम संहिता’ व्यावसायिकांनी आत्मसात करावी – ॲड. अद्वैत पटवर्धन

आयुक्त राम म्हणाले की, शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आणि आकर्षकतेचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. त्यामुळे शहराचे सुशोभिकरण आणि संकल्पनाधारित उद्याने वाढविणे आवश्यक आहे. सध्या, फक्त पु. ल. देशपांडे उद्यान हे अनोख्या संकल्पनेवर आधारित असून त्याच धर्तीवर नवी उद्याने उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. यामुळे पर्यटकांना देशातील विविध राज्यांची संस्कृती एका ठिकाणी अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button