Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महायुतीत असूनही रिपब्लिकन पक्षावर अन्याय; स्थायी समिती सभापतीपद द्या!

PCMC : शहराध्यक्ष तथा नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांची मागणी

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर तसेच उपमहापौरपदी डावल्यानंतर महायुतीत असूनही रिपब्लिकन पक्षावर अन्याय होत असल्याची भावना शहराध्यक्ष तथा नगरसेवक कुणाल वाव्हळकर‌ यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात भाजपाने मोठ्या मनाने रिपाईला उपमहापौर पद देऊन युतीचा धर्म पाळला. त्याप्रमाणे आता पिंपरी चिंचवड मध्ये भाजपाने स्थायी समितीचे सभापती पद देऊन अन्याय दूर करावा अशी मागणी वाव्हळकर यांनी केली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हा लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टी व महायुतीसोबत काम करत आला आहे. मात्र लोकसभा व विधानसभेमध्ये कोणतीही जागा मिळालेली नसतानाही आंबेडकरी समाज आजही महायुतीसोबत ठामपणे उभा आहे. असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षावर होत असलेल्या दुर्लक्षामुळे पक्षाच्या गोटात तसेच आंबेडकरी समाजात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा     :          सुनेत्रा अजित पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२८ पैकी पाच जागा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी प्रभाग क्रमांक २५ मधून कुणाल वाव्हळकर (शहराध्यक्ष) आणि प्रभाग क्रमांक १६ मधून धर्मपाल तंतरपाळे हे दोन उमेदवार निवडून आले. पुणे महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद देण्यात आले असतानाही, पिंपरी-चिंचवड शहरातील नेते व येथील आमदारांना याचा विसर पडल्याची भावना व्यक्त होत आहे.

महायुतीमध्ये प्रामाणिक भूमिका निभावूनही रिपब्लिकन पक्षाला योग्य सन्मान मिळत नसल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदाचा मान रिपब्लिकन पक्षाला द्यावा, अशी ठाम मागणी शहराध्यक्ष, नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी केली आहे. महायुतीने आंबेडकरी समाजाची भावना लक्षात घेऊन न्याय मिळवून भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button