आत्मविश्वासातून व्यक्तिमत्व विकास करा; दीपक शहा
शिक्षण विश्व: प्रतिभा महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
शैक्षणिक अध्यापनाबरोबरच व्यवहारिक जगामध्ये वावरण्यासाठी आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास आणि भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. यातून आपण जगासमोर “प्रेझेंटेबल” होतो. त्यामुळे परीक्षा, नोकरी, मुलाखत या सर्व गोष्टींसाठी आत्मविश्वासातून व्यक्तिमत्व विकास करा असा सल्ला कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा यांनी दिला.
चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील एस. वाय. व टी. वाय. वर्गातील विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास, समूह चर्चा, नोकरीसाठी अर्ज कसा करावा, मुलाखत कशी द्यावी, बौद्धिक चाचणीला कशाप्रकारे सामोरे जावे, व्यक्तिमत्व विकास, भाषेवर प्रभुत्व कसे मिळवावे आधी विषयावर एक सप्ताहाची पूर्ण वेळ कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
हेही वाचा : पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा
प्रतिभा महाविद्यालय व स्मार्ट टँक एज्युकेशन (इन्फोसिस )जी टी टी बार्क्लेज यांच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. त्यात विविध क्षेत्रातील 15 तज्ञ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. त्यांच्या अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे यावेळी तज्ञ प्रशिक्षकांनी दिले.
समारोप कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावरती कमला एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका तेजल शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्रभारी प्राचार्या डॉ क्षितीजा गांधी , मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समन्विका डॉ. हर्षिता वाच्छानी समावेत विविध विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते.