ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
विवाहीतेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सारसच्या चार जणांविरोधात गुन्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/crying-woman.jpg)
पिंपरी चिंचवड | घराच्या हक्कसोड पत्रावर सही करण्यास तसेच घटस्फोट घेण्यास जबरदस्ती करून, विवाहीतेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सारसच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2011 ते 7/7/2021 दरम्यान पुनावळे याठिकाणी हा प्रकार घडला.याप्रकरणी विवाहित महिलेच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार संदीप कांतीलाल पाटील (वय 40), कांतीलाल झावरु पाटील (वय 56, रा. पुनावळे) व दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या विवाहित मुलीला तिच्या रंगावरून माहेरच्या आरोपी लोकांनी वारंवार हिनवले तसेच, घराच्या हक्कसोड पत्रावर सही करण्यास तसेच घटस्फोट घेण्यास जबरदस्ती करून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.