Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – माता-भगिनींचे सामाजिक दायित्व स्वीकारून वेगवेगळ्या क्षेत्रात कौतुकास्पद कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याचा सन्मान जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने ‘भरारी पुरस्कार’ देऊन करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम सोमवारी (दि. २१) दुपारी १ वाजता चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे, अशी माहिती जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली.

या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकारणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड.सचिन पटवर्धन, पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर, भाजपच्या प्रांतिक पदाधिकारी उमा खापरे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, माजी नगरसेविका गीता आफळे, अश्विनी जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी ऊर्मिला पाटील (स्कूल बस चालक), मुन्नी पांडे ( कष्टकरी महिला कामगार), सारीका पवार (पापड केंद्र व्यावसायिका), मीना मस्के (शिक्षिका), उल्का कुटे (गृहिणी), निलीमा पाचपोर (शिक्षिका), इशा मुंशी (ब्युटी पार्लर व्यावसायिका) , सुजाता भोईटे (चपाती केंद्र व्यावसायिका), शारदा रिकामे (योग प्रशिक्षिका) यांचा ‘भरारी’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button