breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

COVID 19 : प्रतिबंधीत क्षेत्र वगळता पिंपरी-चिंचवड शहर आजपासून सुरू

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

लाकडाऊनमुळे थांबलेले शहर आज शुक्रवारपासून खुले होणार आहे. पीएमपीसह सर्वच्या सर्व आस्थापना सुरु करण्यास मोकळीक देण्यात आली असून केवळ कंटन्मेंट क्षेत्रामध्ये निर्बंध लागू राहणार आहेत. तर धार्मिक स्थळांसह शाळा, कॉलेज, हॉटेल, सभा, संमेलने व धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी रात्री उशीरा जारी केले आहेत.

१९ मे २०२० रोजी राज्य शासनाने पिंपरी चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळले होते. त्याच दिवशी राज्य शासनाने अनेक बार्बीमध्ये शिथिलता जाहीर केली होती. मात्र गेल्या आठवडाभरापासून शहरातील वाढणाऱ्या रुग्णांमुळे आढावा घेतल्यानंतरच निर्बंध आणि शिथिलतेबाबत धोरणात्मक निर्णय जाहीर करू , अशी भूमिका महापालिका आयुक्त श्रावण यांनी जाहीर केली होती. यानंतर गुरुवारी त्यांनी शहरातील एकूणच परिस्थितीबाबत निर्णय जाहीर केले आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे शहरातील बहुतांश आस्थापना, दुकाने, कंपन्या खुल्या होण्यास मार्ग मोकळा झाला आहे.

गुरुवारी रात्री आयुक्तांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार शहरातील नागरिकांना केंद्रिय गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय विमान, मेट्रो, रेल्वे प्रवास करता येणार नाही. लॉकडाऊनमुळे तसेच संभाव्य गर्दी व धोके लक्षात घेऊन यापुढेही शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस, हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह, शॉपिंग मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार, सभागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. तसेच राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम, सभा संमेलने, धार्मिक कार्यक्रम पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. ६५ वर्षापुढील व्यक्तींना व दहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना तसेच अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तीना वैदयकीय कारणाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.

कटेन्मेंट क्षेत्रातील व्यक्तीना संबंधित क्षेत्रातून बाहेर येण्यासाठी अथवा बाहेरील व्यक्तींना त्या ठिकाणी जाण्यासाठी व वाहतुकीसाठी प्रतिबंध असणार आहे. मात्र कटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी सर्व प्रकारच्या अस्थापना सुरू करण्यास या आदेशाने परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दुकाने उघडण्यासाठी वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता भासणार नाही. सर्व कंपन्यांना आता पूर्ण क्षमतेने व पूर्ण मनुष्यबळासह ( शंभर टक्के कर्मचारी ) काम करता येणार आहे. या कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाचा आरोग्य सेतू एप आणि महापालिकेचा सारथी एप डाऊनलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कंपनीमध्ये येणारे काही कर्मचारी जर रेडझोन क्षेत्रातून कामावर येणार असतील तर त्यांना कामावर येण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे. सर्व प्रकारच्या वाहतुकीलाही परवानगी देण्यात आली असून दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांनाही परवानगी देण्यात आली आहे. दुचाकीवर एक व्यक्ती, तीनचाकीमध्ये चालक व इतर दोन व्यक्ती तर चारचाकी वाहनांमध्ये चालकासह तीन व्यक्तींना प्रवास करता येणार आहे.

शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व बाजारपेठांमधील दुकाने आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत सुरू ठेवता येणार आहेत. मुख्य बाजारपेठांमधील दुकाने सम व विषय तारखेस उघडी राहिल्यास करोनाला प्रतिबंध घालता येणे शक्य होणार असल्याने सम आणि विषम पद्धतीचा अवलंब काही ठिकाणी करता येणार आहे. यामध्ये पिंपरी कॅम्प, चापेकर चौक, काळेवाडीचा मुख्य रस्ता, मोशी चौक, अजमेरा कॉलनी (पिंपरी), निगडी बसस्टॉप, दिघी जकात नाका, थरमॅक्स चौक ते साने चौक या ठिकाणी सम आणि विषय तारखेचा अवलंब करण्यात येणार आहे. कंटेन्मेंट क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेची दुकाने पूर्वीप्रमाणेच १० ते २ या वेळेत खुली राहणार असून पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत.

शहरातील ४७ कंटेनमेंट झोन :-

१. खराळवाडी परिसर, पिंपरी २. शिवनेरी कॉलनी परिसर, पिंपळे गुरव, ३. रुपीनगर परिसर, तळवडे, ४. मधुबन सोसायटी परिसर, जुनी सांगवी, ५. विजयनगर परिसर, दिघी, ६. इंदिरा नगर परिसर, चिंचवड, ७ शुभश्री हाउस रो हाऊस सोसायटी परिसर, पिंपळे सौदागर, ८. बनकर वस्ती परीसर, मोशी, ९. बजाज शाळा परिसर, संभाजीनगर, १०. न्यु एंजल शाळा परिसर, तळवडे, ११. वुड्स व्हिले सोसायटी परिसर, मोशी, १२. काळेवाडी परिसर, १३. मोहननगर परिसर, चिंचवड, १४. ताम्हाणे वस्ती परिसर, चिखली, १५. तापकीर चौक परिसर, काळेवाडी, १६. निकम वस्ती परिसर, चर्होली बु., १७. साठे नगर परिसर, चर्होली बु., १८. लांडगेनगर परिसर, भोसरी, १९. कस्पटे वस्ती परिसर, वाकड, २०. दत्त नगर परिसर, थेरगाव, २१. गुरुविहार सोसायटी परिसर, भोसरी, २२. हुतात्मा चौक परिसर, भोसरी, २३. छत्रपती चौक परिसर, रहाटणी, २४. आनंदनगर परिसर, चिंचवड स्टेशन, २५. चक्रपाणी वसाहत परिसर, भोसरी. २६. पवना नगर परिसर, जुनी सांगवी, २७. शुभश्री हौसिंग सोसायटी परिसर, आकुर्डी. २८. विकासनगर परिसर, किवळे, २९. तांबे शाळा परिसर, रहाटणी, ३०. फुगेवाडी परिसर, ३१. साई पॅराडाईज परिसर, पिंपळे सौदागर, ३२. पंचदुर्ग को. ऑप. हो.सो. परिसर, रूपिनगर, ३३. कवडे नगर परिसर, पिंपळे गुरव, ३४. अंब्रेला गार्डन परिसर, संभाजीनगर, ३५. अमृतधारा सोसायटी परिसर, दिघी, ३६. मोरेवस्ती परिसर, चिखली, ३७. भाटनागर परिसर, पिंपरी, ३८. ग्यान आंगन सोसायटी परिसर, रहाटणी, ३९. हनुमान कॉलनी परिसर, भोसरी, ४०. अलंकापुरम रोड परिसर, भोसरी, ४१. सदगुरु कॉलनी, वाकड, ४२. श्रीकृष्ण कॉलनी रहाटणी, ४३. शरदनगर, चिखली, ४४, वाल्हेकरवाडी, ४५. आकाशराज सोसायटी, रावेत, ४६. गणेशम सोसायटी, पिंपळे सौदागर, ४७. बालघरेवस्ती चिखली.

वरील परिसरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरातील इतर सर्व बाजारपेठांमधील दुकाने आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत सुरू ठेवता येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button