Breaking-newsपिंपरी / चिंचवड

निवासी, लघुउद्योजक व बिगरनिवासी मिळकतींना तीन महिने कर माफ करा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या कालावधीत पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच उद्योगधंदे बंद असल्याने निवासी, लघुउद्योजक व बिगरनिवासी (कमर्शियल उदा. हॉटेल, दुकाने, छोटे व्यावसायिक इ.) मिळकत धारकांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. त्यामुळे या नुकसानीतून बाहेर येण्यासाठी त्यांना बराच कालावधी लागणार आहे.

पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील सर्व निवासी, लघुउद्योग व बिगरनिवासी (कमर्शियल) मिळकतींवर आकारणेत येणारा तीन महिन्याचा मिळकत कर माफ करणेत यावा, अशा सूचना महापालिका आयुक्तांना करण्यात आल्या आहेत. यामध्ये, बिगरनिवासी (कमर्शियल) ५० हजार पर्यंत, औद्योगिक ४ हजार पर्यंत, आणि मिश्र 20 हजार लघुउद्योजक या मिळकत धारकांना यांचा फायदा होणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना (कोविड १९) विषाणूंचा प्रादुर्भाव तसेच इतर अनुषंगिक कामे तातडीने करणे संदर्भात आयुक्त यांचे दालनात बैठक झाली.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे व आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत खालीलप्रमाणे विविध विषयांवर चर्चा करुन कामे करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button