Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
Coronavirus : पिंपरी-चिंचवडकरांना जिल्हाधिका-यांच्या महत्वाच्या सूचना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/1-19.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील उद्याने, जलतरण तलाव, जीम, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, सिनेमागृहे, खासगी कोचिंग क्लासेस आदी अस्थापना 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
करोना व्हायरसने देशभरात हाहाकार माजवला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष नवलकिशोर राम यांनी हा आदेश काढला आहे. 31 मार्चपर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील उद्याने, जलतरण तलाव, जीम, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, सिनेमागृहे, खासगी कोचिंग क्लासेस आदी अस्थापना बंद ठेवण्यात याव्यात, असे आदेश त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. तसेच, गर्दी जमा होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.