Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपुणे

शहराला पोलीस छावणीचे स्वरूप! १२ हजार जवानांचा खडा पहारा; पहा बंदोबस्ताचा ‘मास्टर प्लॅन’

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी  मतदान होत असून त्यासाठी पार्श्वभूमीवर  शहरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. शहर, तसेच उपनगरात १२ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असून, ९० संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त असेल. अनुचित घटना रोखण्यासाठी शीघ्र कृती दल (क्विक रिस्पाॅन्स टीम), तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर विशेष पथक (स्ट्रायकिंग फोर्स) गस्त घालेल.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, राजेश बनसाेडे, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी केली आहे. शहर, उपनगरात तीन हजार ९८३ मतदान केद्रे (बुथ) आहेत. प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी राहणार आहेत. शहरातील ९१३ इमारतीत मतदान होणार आहे. तेथे दोन पोलीस कर्मचारीअसतील.

हेही वाचा –  विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडून कुंभमेळ्यातील विकासकामांची पाहणी

या निवडणूक प्रक्रियेत १८ स्थिर, १५ फिरती पथके, तसेच व्हिडीओ चित्रीकरणासाठी १५ पथके तयार केली आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ६७ लाखांची रोकड जप्त केली आहे.दारूबंदी कायद्यान्वये १७९ गुन्हे दाखल झाले असून, एक कोटी २३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमली पदार्थ विक्रेत्यांविरूद्ध फास आवळला आहेत.

मेफेड्रोन, गांजा, चरस, नशेच्या गोळ्या असे २६ लाख ८४ हजारांचे अमली पदार्थ जप्त झाले आहेत.मतदारांना चांदीच्या वस्तू, पैशांचे वाटप प्रकरणी पोलिसांनी १७ गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दोन लाख सहा हजार ३५० रुपये जप्त केले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त तैनात केला आहे. मतदान सुरू असताना सर्व घडमोडींचा आढावा वरिष्ठ पोलीस अधिकारी घेतील. अनुचित प्रकार घडल्यास त्वरीत तेथे पोलीस पोहोचतील. मतदान प्रक्रियेत अडथळा, तसेच गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई होईल.”

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button