पोलीस आयुक्त मा. कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते पार पडला गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा.
![Commissioner of Police. Krishna Prakash graced the meritorious students.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Image-2021-08-21-at-3.11.34-PM.jpeg)
चिंचवड | वरील विषयानुसार वरणेकर युनिव्हर्सल फाउंडेशन च्या माध्यमातून चिंचवड,रुपीनगर चिखली परिसरातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ रुपीनगर (पिंपरी चिंचवड)येथे संपन्न झाला.अत्यंत कौटुंबिक वातावरणात व मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत साजऱ्या झालेल्या या कौतुक समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. कृष्ण प्रकाश यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
वरणेकर युनिव्हर्सल फाऊंडेशन सदैव गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, गगन भरारी घेण्यासाठी प्रोत्साहित करत असते व अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कायम तत्पर असते. असे मत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. श्री. धनंजय वर्णेकर व संचालिका सौ. शितलताई वर्णेकर यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना कौतुक पर मार्गदर्शन करताना व आपल्या कविमनाचे प्रदर्शन करताना पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश म्हणाले, नेहमी महान व्यक्तींच्या उत्तम उत्तम बाबी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, उच्च स्वप्न पहा व ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा.
कृष्णप्रकाश यांनी यावेळी रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद अशा राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा संदर्भ देत भविष्यामध्ये विद्यार्थ्यांनी महानतम कार्य करा, असा मौलिक संदेश दिला.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी रुपीनगर परिसरातील युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. किरण पाटील, श्री. तोसिफ मुलानी, श्री सागर लोळगे, श्री केतन पाटील, श्री सचिन ढेरंगे, श्री राजेंद्र पवार उपस्थित होते.
आपल्या खुमासदार शैलीत या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परीक्षित कुंभार सर यांनी केले.
परिसरातील युवा व जेष्ठ नागरिकांनी ,पालकांनी या उपक्रमाचे मनस्वी स्वागत केले व सर्व गुणवंतांना आशीर्वाद पर शुभेच्छा दिल्या.