Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कृष्ण प्रकाश यांची बदली रोखण्याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना साकडे; कृष्णप्रकाश यांची मुदत पुर्व बदली राजकीय हेतूने!

पिंपरी |

पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची मुदतपुर्व बदली ही चुकीची व अन्यायकारक असून ती केवळ आगामी महानगरपालिका निवडणूका विचारात घेवून करण्यात आलेली आहे. त्यामुळे रिपब्लिकन युर्वा मोर्चा, कष्टकरी पंचायत, भिमशाही युवा संघटनेच्या वतीने लेखी (मेलद्वारे) विनंती रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेकडे केली आहे. अशी माहिती डंबाळे यांनी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेस कष्टकरी कामगार पंचायतीचे नेते बाबा कांबळे, भिमशाही युवा संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर उबाळे तसेच रफिक कुरेशी, राहुल ओव्हाळ आदी उपस्थित होते.

यावेळी डंबाळे म्हणाले की, पिंपरी चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्त पदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील संघटीत गुन्हेगारी तसेच अवैद्य धंदे आणि लँड माफीया यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तसेच नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत आजपर्यंत त्यांनी दहा हजार पेक्षा जास्त नागरिकांची समक्ष भेट घेवून त्यांच्या तक्रारी सोडविण्याचा विक्रमही केलेला आहे. त्यामुळे ते पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे अत्यंत आदरणीय अधिकारी ठरले.

परंतु, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कोणत्याही क्षणी होणारी निवडणूक लक्षात घेवून पोलीस आयुक्तांच्या निपक्ष: कारवाईचा आपल्याला फटाका बसू नये म्हणून कृष्ण प्रकाश यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त पदावरून मुदतपुर्व बदली करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड मधील नागरिकांचे जनमत हे कृष्ण प्रकाश यांची बदली रद्द होण्याच्या बाजूचे असून, सरकारने त्याचा सन्मान करीत कृष्णप्रकाश यांना पोलीस आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवडचा आयुक्त पदाचा निर्धारित कालावधी पुर्ण होईपर्यंत त्यांची बदली करू नये अशी विनंती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारकडे डंबाळे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button