Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशी, बोऱ्हाडे परिसरात बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य असल्याचे उघड

बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांचा जामीन

मोशी, चिखली, बोऱ्हाडेवाडी परिसरातील मजुरांचे सत्यापन करण्याच्या मागणीवर जोर

पिंपरी, चिंचवड | प्रतिनिधी

बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांचा जामीन करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बोगस जामीनदारासह बनावट कागदपत्रे तयार करणारी व्‍यक्‍ती आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय भागुजी निकम यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी ३ महिला आरोपींसह सम्राट बाळा बाळा (वय २३, रा. सह्याद्री कन्स्ट्रक्शन साईट, लेबर कॅम्प, बोऱ्हाडेवाडी, मोशी, पुणे, मूळगाव – बहादूरपूर, बांगलादेश) तसेच बनावट जामीनदार म्हणून हजर राहिलेले अनोळखी व्‍यक्‍ती व बनावट कागदपत्रे तयार करणारे इतर व्‍यक्‍ती यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

असा झाला उलगडा

पोलिसांच्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील बांगलादेशी आरोपींनी खोट्या जामीनदारांच्या मदतीने व बनावट कागदपत्रांचा वापर करून न्यायालयाची व पोलिसांची फसवणूक करत जामीन मिळवला. जामीनावर सुटल्यावर संबंधित आरोपींनी पुन्हा कधीही न्यायालयात हजेरी लावलेली नाही. तसेच सध्या ते राहत्या पत्त्यावरही सापडत नाहीत. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

हेही वाचा   :  ‘..तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते’; शहाजीबापू पाटलांचं वक्तव्य चर्चेत 

स्थलांतरित मजुरांचे सत्यापन करा

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेने चिखलीतील एका लेबर कॅम्प मध्ये बेकायदेशीर दारू अड्डा चालवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हा दारूचा अड्डा उध्वस्त केला होता. यावेळी नागरिकांनी या लेबर कॅम्पमध्ये बांगलादेशी नागरिकांचे रहिवास असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या भागात नागरिकांचे सत्यापन होणे गरजेचे आहे. असे मोशी, चिखली भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.

चिखलीमध्ये बांगलादेशींना आश्रय दिल्याचे उघड

मार्च महिन्यामध्ये चिखली कुदळवाडी भागामध्ये बांगलादेशी महिलेसोबत विवाह करून तिला आश्रय दिला गेल्याचे उघड झाले होते. महिलेचा पर्यटन व्हिसा संपल्यानंतर बांगलादेश येथे परत पाठवणे आवश्यक असताना, तिला पाठवले नाही. याप्रकरणी बांगलादेशी महिलेसह तिच्या पतीला अटक करण्यात आली संबंधित महिला 2022 पासून शहरात वास्तव्याला होती. तीन वर्षानंतर हा प्रकार उघडकीस आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button