आकुर्डीमध्ये “जय भवानी जय शिवाजी”चा जल्लोष!
शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात साजरी

पिंपरी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड मधील आकुर्डी भागामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. “जय भवानी जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
शिवसेनेच्या (शिंदे गट) उपनेत्या सुलभा उबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आकुर्डी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या पुढाकारातून शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर उपस्थित होत्या. सुलभा उबाळे यांची शिवसेना उपनेते पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला.
हेही वाचा – BCCI ने आयपीएलच्या नियमात केला बदल, ‘या’ सामन्यापर्यंत संघात करता येणार बदल
यावेळी प्रमोद कुटे म्हणाले, सुलभा उबाळे यांच्यासारख्या रणरागिणी, आक्रमक नेतृत्व आपल्या सोबत आल्यानंतर या भागातील शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महिला शक्तीची एकजूट उबाळे यांच्या पाठीशी आहे.
न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली…
सुलभा उबाळे म्हणाल्या शिवसेनेच्या माध्यमातून या भागातील प्रश्न तडीस न्यायचे आहेत. सर्वसामान्य कष्टकरी वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे आहे. येथील नागरिकांना शिवसेनेकडून अनेक अपेक्षा आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची, त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे. गेल्या अडीच वर्षापासून या भागांमध्ये प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय राजवटीमुळे नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते.या प्रश्नांसाठी शिवसैनिक नागरिकांच्या पाठीशी उभा ठाकला पाहिजे असे आवाहन यावेळी सुलभा उबाळे यांनी केले.