पिंपरी / चिंचवड

सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणा-या दोन महिलांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

महामार्गाच्या बाजूला थांबून वेश्या व्यवसायासाठी सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणा-या दोन महिलांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 23) दुपारी साडेपाच वाजता मुंबई-बेंगलोर महामार्गावर किवळे ब्रिजखाली घडली.

सचिन संजीवन शिंदे (वय 29, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांच्या विरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बेंगलोर महामार्गावर किवळे ब्रिजच्या खाली दोन महिला वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करत होत्या. सार्वजनिक ठिकाणी येणा-या जाणा-या लोकांना अडथळा निर्माण करून सार्वजनिक सभ्यतेचा व शिष्टाचाराचा भंग होईल असे वर्तन त्या महिलांनी केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button