Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीतील काजळे पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड | मोशी येथील इंडियन ऑइल काजळे पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 10 जून रोजी दुपारी सुमारे 3.20 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. फिर्यादी पांडुरंग एकनाथ कुचेकर हे त्यांच्या ॲक्टिव्हा दुचाकीवरून बहिण सविता दयानंद कांबळे (वय 30) यांना मोशीतील इंडियन ऑइल काजळे पेट्रोल पंप परिसरातून आदर्शनगर येथील घरी घेऊन जात होते.

हेही वाचा

ओमानजवळ अमेरिकन नौदलाचा मालवाहू जहाजावर भीषण हल्ला; ३ भारतीय खलाशांचा मृत्यू

यावेळी कंटेनर क्रमांक NL 01 AD 2845 चा चालक सुंदर पंढरीनाथ गवळी (वय 26) याने वाहन भरधाव वेगात, निष्काळजीपणे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करत चालवून दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे.

या अपघातात सविता कांबळे यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पानसरे करीत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button