पिंपरी / चिंचवड

बालविवाह करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

घरासमोर मंडप टाकून 14 वर्षीय मुलीचा विवाह लाऊन देण्याची तयारी करत असेलल्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 25) सकाळी बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडला.

विकास मोहन पवार (वय 23), प्रकाश मोहन पवार (वय ४८), पुष्पा दिनेश मोरे (वय 35), दीपा मारुती क-हाडे (वय 45) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पुष्पा मोरे यांच्या 14 वर्षीय मुलीचा बालविवाह करण्याची तयारी केली. त्यासाठी त्यांनी घरासमोर मंडप टाकला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button