Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीत निवडणुकीच्या तोंडावर दहशत माजवण्याचा प्रकार; भाजपाकडून तीव्र निषेध

मिशन- PCMC : “लोकशाहीत दहशतीला स्थान नाही; दोषींवर कठोर कारवाईची मागणी”

पिंपरी-चिंचवड | निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर चिखली येथे दहशत माजवण्याचा गंभीर प्रकार घडल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी २ ते २.३० दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अ. पवार गट) च्या १५ ते २० कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक १ चे भाजप उमेदवार श्री. गणेश दत्तात्रय मळेकर यांच्या खासगी मालकीच्या ‘मळेकर इस्टेट’ (ग्रँड मैफील हॉटेल परिसर) मध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी प्रभाग क्रमांक १ चे अपक्ष उमेदवार श्री. संतोष साने यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार आहे.

घटनेदरम्यान परिसरात गोंधळ व आरडाओरडा सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर श्री. मळेकर यांचे बंधू श्री. महेश मळेकर व कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले असता त्यांनाही मारहाणीचा सामना करावा लागल्याचे सांगण्यात आले. तसेच वीट-दगडफेक करण्याचा प्रयत्न झाल्याने हॉटेल परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळात वाहनांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा     :        वाहनधारकांना दिलासा! FASTag केवायव्हीची कटकट संपणार, कधीपासून लागू होणार नवा नियम?

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
निवडणुकीच्या तोंडावर शांत व सुसंस्कृत प्रतिमेच्या चिखलीत अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत निंदनीय असल्याचे भाजपने म्हटले आहे. राजकीय स्वार्थासाठी दहशत, गुंडगिरी व हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ ग्रँड मैफील हॉटेल, चिखली येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजपचे प्रभाग क्रमांक १ चे उमेदवार श्री. गणेश मळेकर, श्री. सुरेश तात्या म्हेत्रे, सौ. सोनम मोरे, सौ. शीतल यादव यांच्यासह श्री. विनायक मोरे व श्री. जितेंद्र यादव उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याची प्रशासनाकडे ठाम मागणी केली.

“निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या खासगी मालकीच्या जागेत बेकायदेशीरपणे प्रवेश करून दहशत माजवण्याचा आणि मारहाणीचा जो प्रकार घडला, तो अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे. चिखलीसारख्या शांत व सुसंस्कृत गावात गुंडगिरी व हिंसाचाराला मुळीच स्थान नाही. लोकशाहीत निवडणूक ही विचारांची लढाई असते, दहशतीची नाही. अशा प्रवृत्तींवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडावी, हीच आमची ठाम मागणी आहे.”

– गणेश मळेकर, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 1.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button