ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
चिंचोली येथे कार आणि बाईकचा अपघात, बाईक चालकाचा मृत्यू
![Car and bike accident at Chincholi, death of biker](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/Accident.jpg)
पिंपरी चिंचवड | कार आणि बाईकच्या अपघातात बाईक चालकाचा मृत्यू झाला आहे. चिंचोली येथे शनी मंदीरासमोर गुरुवारी (दि.10) रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. राहुल दिगंबर ढमढेरे (वय 31) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ अतुल दिगंबर ढमढेरे (वय 34, रा. तळेगाव ढमढेरे, शिरुर) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राहुल आपली बाईक वरुन (MH 12 JP 5418) शनी मंदीरासमोरुन किन्हईच्या दिशेने जात होते. त्यावेळी धरधाव आलेल्या इर्टिंगा कारने (MH 14 HF 7227) बाईकला जोराची धडक दिली. या धडकेत बाईक चालक गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला आहे. देहुरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.