Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

धीरेंद्र शास्त्रींच्या साईबाबांबद्दलच्या वक्तव्यावरून अजित पवारांनी घेतला समाचार

धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री सातत्याने आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर त्यांनी शिर्डीचे साईबाबा यांना देव मानण्यास नकार दिला. दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धीरेंद्र शास्त्रींनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला, याबद्दल मुंबईत पत्रकारांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, या बाबा लोकांचे जास्त ऐकू नका. हे भोंदू बाबा आहेत, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, साईबाबांना देव म्हणायचे नाही मग तुम्हाला जोकर म्हणायचे का? लाखो साई भक्तांच्या भावना दुखावल्या प्रकरणी धीरेंद्र शास्त्रींवर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button