Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
Breaking : पिंपरी चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ‘रेड’; स्वीय सहाय्यक जाळ्यात
- स्थायी समिती, महापौर कार्यालयात तपासणी
पिंपरी – महापालिका भवनात स्थायी समितीच्या स्वीय सहाय्यकास लाच घेताना बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रंगेहाथ पकडले आहे. त्यानंतर महापालिका भवन आवारातील महापौर, स्थायी समिती कार्यालयातही एसीबीच्या पथकाने तपासणी केली.
पिंपरी चिंचवड मधील महापालिका भवनात सायंकाळी साडेचार वाजता महापालिका पार्किंगमध्ये स्थायी समितीचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांना काही रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर एसीबी पथकाने पिंगळे यांना ताब्यात घेतले आहे.त्यानंतर सायंकाळी पावणेसहापर्यंत तपासणी सुरू होती. याबाबत सविस्तर तपशील मिळू शकला नाही.





