मोशीतील जाधववाडी ते बोऱ्हाडेवाडी रस्त्याचे ‘ब्युटिफिकेशन’
आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते भूमिपूजन
![Bhoomipujan by MLA Mahesh Landge from Jadhavwadi to Borhadewadi road in Moshi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Mahesh-Landge-1-3-780x470.jpg)
‘अर्बन स्ट्रिट डिझाईन’ प्रकल्पाची होणार अंमलबजावणी
पिंपरी : मोशी येथील सीएनजी पंप जाधववाडी ते बोऱ्हाडेवाडी ३१ मीटर रस्त्याचे ‘अर्बन स्ट्रिट डिझाईन’ प्रकल्पाच्या माध्यमातून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे फुटपाथ आणि पदपथ अत्यंत सुसज्ज होणार आहेत.
भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक २ मधील सी.एन.जी. पंप पासून मोशी मार्केट पर्यंतचा मुख्य रस्ता अध्ययावत पद्धतीने विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या रस्त्यांची लांबी सुमारे २ हजार ४६० मीटर इतकी आहे.
हेही वाचा – ‘मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये मोदींची जादू चालणार नाही’; संजय राऊतांचा हल्लाबोल
यावेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, अश्विनी जाधव, उद्योजक निलेश बोराटे, निखिल बोऱ्हाडे, मंगेश हिंगणे, नितीन बोऱ्हाडे, अतुल बोराटे, संभाजी बोऱ्हाडे, नरेंद्र कस्तुरे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांना सक्षमपणे पायाभूत सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. रस्ते प्रशस्त झाले पाहिजेत. तसेच पादचारी आणि सायकलस्वारांनाही स्वतंत्र लेन उपलब्ध झाली पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अतिक्रमणमुक्त पदपथ आणि प्रशस्त रस्ते या संकल्पनेतून मोशीतील मुख्य रस्ता विकसित होत आहे. प्रशासनाने सदर काम जलदगतीने मार्गी लावावे, अशी अपेक्षा आहे.
महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.