पिंपरी / चिंचवड

विनाकारण बाप-लेकाला बेदम मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

घरात घुसून बाप लेकाला तिघांनी बेदम मारहाण केली. एकाने मुलाच्या कानाला चावा घेऊन कानाचा तुकडा पाडला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री साडेनऊ वाजता ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी येथे घडली.

सिरातुल्ला हसमुल्ल टेलर (वय 55, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इरशाद रफिक सलमानी (वय 22), सौजाद रफिक सलमानी (वय 32), सदाम शौकतअली सलमानी (वय 35, रा. आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इरशाद फिर्यादी यांच्या घरात आला. त्याने काहीही कारण नसताना फिर्यादी यांच्या घरातील भांदुकुंडी फेकून दिली आणि शिवीगाळ करत फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. याबाबत फिर्यादी यांच्या मुलाने आरोपीला जाब विचारला असता आरोपीने त्याच्या दोन साथीदारांना बोलावून फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली. त्यानंतर इरशाद याने फिर्यादी यांच्या मुलाच्या कानाला चावा घेतला आणि कानाचा तुकडा पाडला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button