ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

NEET-UG 2026 मध्ये अतुल्या डोंगरेची दैदिप्यमान भरारी; 670 गुणांसह देशात 498 वा क्रमांक!

बारावीत 97.6 टक्के गुणांची कामगिरी; सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि पालक-शिक्षकांच्या पाठिंब्याच्या जोरावर मिळवले यश

पिंपरी- चिंचवड : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) 2026 मध्ये पिंपरीतील अतुल्या बाळासाहेब डोंगरे हिने 720 पैकी 670 गुण मिळवत अखिल भारतीय गुणवत्ता यादीत (AIR) 498 वा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अतुल्याने हे यश कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिस्तबद्ध नियोजनाच्या जोरावर मिळवले आहे. तिने दहावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई बोर्डातून पूर्ण केले, तर अकरावी व बारावीचे शिक्षण सीबीएसई बोर्डातून घेतले. बारावीच्या परीक्षेतही तिने 97.6 टक्के गुण मिळवत शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली.

NEET परीक्षेच्या तयारीदरम्यान अतुल्याने नियमित वर्गांना उपस्थिती, रोजचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करणे आणि कोणताही बॅकलॉग न ठेवणे, या सवयी अंगीकारल्या. अभ्यासातील शंका तत्काळ शिक्षकांकडून दूर करून घेणे, जीवशास्त्रासाठी एनसीईआरटीच्या पुस्तकांचा सखोल अभ्यास आणि भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रासाठी मोठ्या प्रमाणात प्रश्नसंचांचा सराव, यावर तिने विशेष भर दिला.

आपल्या यशाबद्दल बोलताना अतुल्या म्हणाली, “परीक्षेच्या काळात काही प्रमाणात तणाव होता. मात्र, पालक आणि शिक्षकांचा सातत्याने मिळालेला पाठिंबा आणि स्वतःवरील विश्वास यामुळे मी लक्ष विचलित होऊ दिले नाही. नियमितता आणि सातत्य हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली ठरली.”

हेही वाचा –  ‘सिंचन प्रकल्पांसाठी भरीव तरतूद; प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भविष्यातील ध्येयाविषयी ती म्हणाली, “उत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून पुढे आवडीच्या विषयात विशेष प्राविण्य मिळवायचे आहे. त्यानंतर देशात राहून वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याची माझी इच्छा आहे.”

अतुल्याचे वडील बाळासाहेब डोंगरे यांनी सांगितले, “डॉक्टर होण्याचा निर्धार तिने बालपणापासून केला होता. त्या दिशेने तिने सातत्याने मेहनत घेतली. आम्ही तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी उभे राहिलो. तिच्या यशाचा आम्हाला मनापासून अभिमान आहे.”

आई शर्मिला डोंगरे म्हणाल्या, “अतुल्या लहानपणापासून अभ्यासू, जिद्दी आणि मेहनती आहे. एखादे उद्दिष्ट निश्चित केले की ते पूर्ण केल्याशिवाय ती थांबत नाही. तिच्या मेहनतीचे आज सार्थक झाले असून, तिच्या यशाचा आम्हाला खूप आनंद आहे.”

NEET-UG 2026 मधील या दैदिप्यमान यशामुळे अतुल्या डोंगरेने वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या वाटचालीचे भक्कम पायाभरणी केली असून, तिच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासासाठी विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“NEET परीक्षेच्या तयारीत मी नियमितता आणि सातत्याला सर्वाधिक महत्त्व दिले. रोजचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करण्याचा आणि कोणताही बॅकलॉग न ठेवण्याचा प्रयत्न केला. पालक, शिक्षक आणि स्वतःवरील विश्वासामुळे हे यश मिळवता आले. पुढे उत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन देशात राहून समाजासाठी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून योगदान देण्याची माझी इच्छा आहे.”

– अतुल्या डोंगरे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button