गरिब, अनाथ, वंचित-ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी लढणाऱ्या अनुराधा साळुंके मैदानात!
मिशन PCMC : महापालिका चऱ्होली, मोशी, डुडूळगाव प्रभाग-3 मध्ये होणार चूरस

पिंपरी- चिंचवड। प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र. 3 अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून अनुराधा दिपक साळुंके यांनी उमेदवारी जाहीर केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या व कठोर संघर्षातून उभी राहिलेल्या अनुराधा साळुंके यांच्या वाटचालीत कर्तव्य, संवेदनशीलता आणि समाजसेवेची निष्ठा स्पष्ट दिसते.
अनुराधा साळुंके या “खुशी चॅरिटेबल ट्रस्ट”च्या संस्थापक उपाध्यक्ष असून, त्यांच्या पती मा. श्री. दिपक गेणु साळुंके हे संस्थापक अध्यक्ष म्हणून ट्रस्टचे नेतृत्व करत आहेत. या दोघांनी मिळून ऊसतोड कामगार, आदिवासी वस्ती, गरिब व अनाथ मुलांच्या शिक्षण–आरोग्याच्या दिशेने उल्लेखनीय काम सुरू केले आहे.
शाळा व विनामूल्य वसतिगृहाची योजना, शिक्षणासाठी आर्थिक अडचणीत असलेल्या मुलांना मदत, कुपोषण, निरक्षरता, आरोग्य समस्यांवरील उपक्रम, कोरोना काळात अनाथ झालेल्यांना आधार, अशा अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी शेकडो कुटुंबांमध्ये आशेचा दिवा पेटवला आहे.

गरिबीतून उभा राहिलेला जिद्दीपणा…
श्री. दिपक साळुंके यांचा संघर्षमय प्रवास स्वतःमध्ये प्रेरणादायी आहे. अवघ्या १४–१५ व्या वर्षी शिक्षण सोडून मजुरीला लागण्याची वेळ आली, आर्थिक अडचणी, कुपोषण, रोगराई यांचा सामना करत मोठे होताना समाजातील वास्तव त्यांनी जवळून पाहिले. या सर्व अनुभवांनंतर समाजाच्या विकासासाठी काहीतरी करण्याचा निर्धार त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने केला. आज त्या अनुभवांमधूनच खुशी चॅरिटेबल ट्रस्ट जन्माला आला आहे आणि अनेकांचे जीवन बदलत आहे.
“माझा प्रभाग, माझी जबाबदारी”
अनुराधा साळुंके या MA (Master of Arts) उच्चशिक्षित असून MPSC विद्यार्थीनी म्हणून प्रशासकीय व्यवस्थेची जाण त्यांना आहे. त्या सांगतात, “जात, धर्म, भेद, मोह – या सर्व गोष्टींचा त्याग करून शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेत स्वतःला अर्पण करेन.” प्रभाग क्र. 3 मधील नागरिकांना त्यांच्या हक्काचा सेवेकरी म्हणून त्या स्वतःला समर्पित करत आहेत. अनुराधा साळुंके यांनी निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेने प्रभागातील अनुसूचित जाती समाजासह इतर घटकांमधूनही उत्साह दिसत आहे. त्यांनी केलेल्या शिक्षण–आरोग्य उपक्रमांमुळे अनेक कुटुंबांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.
प्रभागातील नागरिकांसाठी प्रमुख वचने :
1. ✔️ प्रभागातील मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण
2. ✔️ अनुसूचित जाती समाजासाठी शासकीय योजनांचे लाभ घरपोच
3. ✔️ महिलांसाठी स्वावलंबनाचे प्रकल्प
4. ✔️ जलसंधारण, स्वच्छता, आरोग्य सुविधा वाढवणे
5. ✔️ झोपडपट्टी व कामगार कुटुंबांसाठी मूलभूत सुविधा
6. ✔️ समाजात ऐक्य, बंधुता आणि शांतता यांना प्राधान्य
चऱ्होली आणि परिसरातील जनतेची साथ मिळाल्यास प्रभागाचा चेहरा बदलण्याचा निर्धार आहे. मी राजकारणात येत नाही, मी समाजाच्या वेदना घेऊन येते आहे. माझा प्रभाग, माझी जबाबदारी – हीच माझी खरी ओळख आहे. सत्तेवर नाही तर सेवेवर माझा विश्वास आहे. कारण सेवा हीच माझी ओळख आणि शक्ती आहे.
– अनुराधा दिपक साळुंके, उपाध्यक्षा, खुशी चॅरिटेबल ट्रस्ट.





