संत मदर तेरेसा पुलावर उभारला आणखी एक रॅम्प

पिंपरी : संत मदर तेरेसा हा ऑटो क्लस्टर ते काळेवाडी दरम्यान उभारला आहे. हा पूल चिंचवडमधून जातो. मात्र चिंचवडकर नागकरिकांना त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. अखेर या पुलावर जाण्यासाठी रॅम्प उभारण्यात आला आहे. त्यामुळे चिंचवडमधील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लवकरच हा रॅम्प वाहन चालकांसाठी खुला करण्यात येणार आहे.
ऑटो क्लस्टर, चिंचवड ते काळेवाडी दरम्यान संत मदर तेरेसा पूल उभारण्यात आला आहे. हा पुल पिंपरी चिंचवड लिंक रस्त्यावरून जातो. मात्र चिंचवडकरांना त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. जर या पुलाला जोडण्यासाठी रॅम्प तयार केला तर चिंचवडमधील वाहन चालकांना याचा मोठा उपयोग होऊ शकतो, हे जाणून माजी नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी रॅम्पबाबत २०१८ मध्ये महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला. मात्र विकास आराखड्यात येथील जागा नसल्याने येथील जागा मालक श्रीकांत गावडे, उत्तम गावडे, मुकुंद गावडे, राकेश गावडे, राजेश गावडेआणि तोताराम सुखवानी यांना रम्पचे महत्व समजून सागितले. टीडीआरच्या बदल्यात त्यांनी जागा दिल्या.
हेही वाचा – रात्रीस खेळ चाले.. पिंपळे निलखमध्ये नदीपत्रातून अवैध वाळू उपसा सुरू, हजारो ब्रास वाळूची होतेय चोरी
महापालिकेने १५ कोटी ८९ लाख रुपयांची निविदा मंजूर केली. १७ ऑगस्ट २०२१ रोजी वर्क ऑर्डर दिली. मात्र पाटबंधारे विभागाची एनओसी येण्यासाठी वेळ लागला. सध्या चिंचवडमधून ऑटो क्लस्टरकडे जाणारा रॅम्प तयार झाला आहे. तसेच चिंचवडमधून काळेवाडीकडे जाणार्या रॅम्पचे काम महिनाभरात पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा रॅम्प वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
सध्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावर जाण्यासाठी चिंचवड स्टेशन आणि पिंपरी उड्डाणपूल हे दोन पर्यायआहेत. लवकरच चिंचवड स्टेशन कडून चिंचवड गावाकडे येणारा रेल्वे उड्डाणपूल पाडून नवीन पूल उभारण्यात येणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. पिंपरी चिंचवड लिंक रोडवर संत मदर तेरेसा पुलावर उभारण्यात आलेला रॅम्प हा पिंपरी आणि चिंचवड स्टेशन येथील उड्डाण पुलाला पर्याय ठरणार आहे.
काळेवाडी ते चिंचवडगाव दरम्यान चिंचवड विद्युत स्मशानभूमी पासून ते पिंपरी चिंचवड लिंक रोडवर जाण्यासाठी पर्यायी रस्त तयार केला आहे. मात्र दोन ठिकाणी जागा मालकांनी जागा ताब्यात दिलेल्या नाहीत. मात्र इतर भागात रस्ता तयार झाला आहे. जर या जागा ताब्यात आल्यास केशवनगर, तानाजी नगर येथील नागरिकांना पुणे मुंबई रस्त्यावर येणार्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.