पिंपरी / चिंचवड

‘त्या’ लखोबा लोखंडेवर आणखी एक गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून महिलेकडून पाच लाख रुपये घेतले. ते पैसे परत न करता तिची फसवणूक केली. तसेच महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना 22 जुलै 2021 ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत भूमकर चौकाजवळ वाकड येथे घडली. या घटनेतील आरोपीने अनेक महिलांना नावे बदलून गंडे घातले आहेत. त्याच्या साथीदारासोबत त्याला बेंगलोर येथून अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. 27) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अश्विन शुक्ला (रा. बालेवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लखोबा लोखंडेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. दरम्यान त्याने महिलेसोबत व्हाट्सअप वरून संपर्क करत असताना त्याचे नाव अश्विन शुक्ला असे सांगितले. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फिर्यादीकडून पाच लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादीच्या इच्छे विरुद्ध त्यांच्याशी अश्लील कृत्य करून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी फसवणूक आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button