Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नाना काटे यांना “आदर्श नगरसेवक” पुरस्कार

पिंपरी :  जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या वतीने 8 व्या युवा संसद चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांना “आदर्श नगरसेवक” पुरस्कार देण्यात आला.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या वतीने दरवर्षी प्रमाणे संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या परिषदेत आदर्श खासदार आमदार, नगसेवक व इतर पुरस्कार देण्यात येतात. यावेळी या कार्यक्रमात जाधवर ग्रुपच्या वतीने विठ्ठल उर्फ नाना काटे यांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल “आदर्श नगरसेवक” पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल जाधवर ग्रुपचे नाना काटे यांनी आभार व्यक्त केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्स चा वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात याचे देखील नाना काटे यांनी कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा –  कोंडीमुक्त पुण्यासाठी १०० दिवसांचा आराखडा

यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, सुधीर मुनगंटीवार, खासदार अरविंद सावंत, आमदार सत्यजित देशमुख, आमदार अमित गोरखे, ॲड. मंगेश ससाणे, वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार यांना देखील उल्लेखनीय कार्याबद्दल विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या संस्थेच्या माध्यमातून ज्या तरुणांना राजकारणात जायचे आहे. अशा तरुणांना मार्गदर्शन करण्याचे काम केले जाते. या कार्यक्रमप्रसंगी जाधवर ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर,उपाध्यक्ष ॲड. शार्दूल सुधाकर जाधवर, संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button