Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
आकुर्डी पीएफ कार्यालयात अंशदात्यांसाठी आधार नोंदणी शिबिर
- 100 नागरिकांचा सहभाग
पिंपरी ! प्रतिनिधी
आकुर्डीतील कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) कार्यालयात अंशदात्यांसाठी आधार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंशदात्यांच्या आधार कार्डमध्ये सुधारणा व इतर माहिती अद्ययावत करण्यात आली. शंभरहून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन क्षेत्राय भविष्य निधि आयुक्त-। के. रविंद्र कुमार व भविष्य निधी आयुक्त-।। अनुक्रमे आशुतोष, मितेश राजमाने, सचिन बोराटे व बिजयंत कुमार यांच्या हस्ते झाले. शिबिरासाठी भारतीय डाक विभागाचे जनसंपर्क अधिकारी के. एस. पारखी यांचे सहकार्य लाभले. भविष्य निधीशी निगडित अंशदात्यांना आधारकार्डमध्ये चुका किंवा फेरफार असल्यामुळे त्यांची केवायसी अद्ययावत करून खात्यातून अंशदान काढण्यासाठी अडचणी येतया. त्यामुळे पीएफ कार्यालयाने शिबिराचे आयोजन केले.





