breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न

पिंपरी : भारतीय जनता पार्टी , पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) आणि भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष मा.श्री.शंकरशेठ जगताप यांच्या पुढाकाराने , कुंदाताई संजय भिसे यांच्या भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय पिंपळे सौदागर येथे पिंपळे सौदागर प्रभागातील आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या मोफत आरोग्य शिबिरात , जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या साह्याने आरोग्य तपासणी व तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात , जनरल तपासणी व आणि उपचार , डायबिटीस तपासणी आणि उपचार , कॅन्सर स्कॅनिंग तपासणी , ओरल कॅन्सर तपासणी व सल्ला , ब्लड प्रेशर तपासणी आणि उपचार, डोळे तपासणी साथीचे आजार आवश्यक रक्त तपासणी सल्ला आणि उपचार यासंबंधी विविध तपासण्या नागरिकांसाठी मोफत आयोजित करण्यात आल्या.

पिंपळे सौदागर येथील प्रभागस्तरीय शिबिराचे उद्घाटन शहराध्यक्ष मा.शंकरशेठ जगताप आणि चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा डॉ.सौ कुंदाताई संजय भिसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शिबिराचा लाभ घेण्यासाठी विविध वयोगटातील नागरिक , महिला व जेष्ठ नागरिकांनी गर्दी केली होती. 260 हुन अधिक नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

हेही वाचा       –        अमित शाहांची शरद पवारांवर टीका, अजित पवार गटाचा आमदार नाराज

याप्रसंगी , प्रतिक्रिया व्यक्त करताना , शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप म्हणाले , “महाराष्ट्र राज्याला शाश्वस्त विकासमार्गावर घेऊन जाण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे महत्त्वाचे योगदान आहे. आज महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजना या देवेंद्रजींच्या दूरदृष्टीने सुरू झाल्या आहेत. समाजातील विविध घटकाला सामावून घेत देवेंद्रजींनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने अग्रेसर ठेवले आहे. मा.देवेंद्रजींचा वाढदिवस समाजपयोगी कार्यक्रमांनी साजरा व्हावा असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा मनोदय होता. त्याच माध्यमातून आम्ही संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरभर प्रभाग निहाय मोफत आरोग्य शिबीर आयोजित करत आहोत.या शिबिराचा फायदा गरजू नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करतो.”

चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा डॉ.सौ कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची नेतृत्व सर्वसमावेशक आहे. महिला , युवक , जेष्ठ नागरिक , युवा , नोकरदार , उद्योजक अश्या प्रत्येक समाजघटकाच्या उन्नतीसाठी देवेंद्रजी कटिबद्ध असतात. महिलांसाठी त्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असुदे अथवा शेतकरी सन्मान योजना . या प्रत्येक योजनेद्वारे प्रत्यक्ष लाभार्थी व्यक्तीपर्यंत लाभ मिळावा हे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून महागड्या चाचण्या नागरिकांना मोफत प्राप्त होणार असून , त्याचा फायदा गरजू रुग्णांणी अवश्य घ्यावा, असे मी आवाहन करते.”

याप्रसंगी , उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक श्री.संजय भिसे, अध्यक्ष भाजप पिं चिं शहर (जिल्हा) राहटणी सांगवी मंडल संदीप नखाते , ह.भ.प विकास काटे , आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जसवाल ,विठाई वाचनालयचे डॉ सुभाषचंद्र पवार व रमेश वाणी ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन चे विलास जोशी , उन्नती सोशल फाउंडेशन चे सर्व सभासदयांच्या सह डॉ.दिनेश कुमार जाधववर , वैभव कुंभार , इशा कदम , वृषाली शिंदे , गजानन मोरे , कल्याण जगदाळे ,धनराज येवले , रामकृष्ण इंगळे , आरिफ शेख ,नाजुका घोरपडे ,श्रुती जोशी , सुप्रिया चिखले ,अनमोल भोळे आदी वैद्यकीय कर्मचारी आणि पिंपळे सौदागर मधील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button