Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शवविच्छेदनाच्या कर्तव्यात कसूर केल्याने दोन डाॅक्टर पालिका सेवेत बडतर्फ

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील दोन डॉक्‍टरांना वैद्यकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून डॉ. श्रीराम तुळशीराम भंडारे व डॉ. राजीव शामराव शहारे यांना महापालिका सेवेतून काढण्यात आले. असा आदेश आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

महापालिकेच्या वायसीएमएम रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी या गट ‘ब’ दर्जाच्या पदावर डाॅक्टर कार्यरत होते. त्यांच्याकडे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) विभागाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. 21 मार्च 2016 रोजी वायसीएममध्ये तीन मृतदेह शवविच्छेदनासाठी आले होते. त्यासाठी डॉ. शिंगे हे अनुपस्थित होते. तर डॉ. भंडारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्यांचा भ्रमणध्वनी बंद करून ठेवल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांना या मृतदेहांचे शवविच्छेदन करावे लागले. याशिवाय 27 एप्रिल 2016 रोजी शवविच्छेदनासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीची पूर्वसूचना देऊनही हे दोन्ही अधिकारी अनुउपस्थित राहिले.

दोन्ही डॉक्‍टरांनी नमून दिलेल्या कर्तव्यात नितांत सचोटी न राखता, हेतुपुरस्सरपणे केलेला हलगर्जीपणा आणि बेजबाबदार वर्तणुकीबाबत त्यांना सेवानिलंबित करुन, त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र. शवविच्छेदन गृहातील अत्यंत संवेदनशील कामकाज आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन, त्यांचे सेवानिलंबन रद्द करून, त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु ठेवली होती.

महापालिका आयुक्‍त हर्डीकर यांना प्राप्त झालेल्या अहवालात या दोन्ही डॉक्‍टरांवरील दोषारोप शाबित झाले. तसेच डॉ. भंडारे यांनी त्यांच्यावरील दोषारोप मान्यदेखील केले. याशिवाय डॉ. भंडारे हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करीत असून, विनापरवानगी गैरहजेरी लक्षात घेता, ते कर्तव्यावर रुजू होण्याची शक्‍यता नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. या दोन्ही डॉक्‍टरांना बचावासाठी अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्याचा महापालिका प्रशासनाला अद्यापही खुलासा प्राप्त झालेला नाही. दोन डॉक्‍टरांना महापालिका सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याशिवाय या दोन्ही डॉक्‍टरांची एक लाख रुपयांची बँक गॅरंटीदेखील जप्त करण्याचे आदेश आयुक्‍त हर्डीकर यांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button