Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी विधानसभेत ५ वाजेपर्यंत ४३.३६ टक्के मतदान, चिंचवडमध्ये ५०.०१ टक्के मतदान तर भोसरी विधानसभेत ५५.०८ टक्के मतदान

 पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ४.०४ एवढे मतदान झाले होते. ११ वाजेपर्यंत ११.४६ टक्के मतदान, दुपारी १ वाजेपर्यंत २१.३४ टक्के मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत ३१.५८ टक्के मतदान झाले. तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४३.३६ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि महाविकास आघाडीचे सुलक्षणा शीलवंत यांच्यात थेट लढत होत आहे.

२०६ पिंपरी विधानसभापरी विधानसभेत ५ वाजेपर्यंत ४३.३६ टक्के मतदान

सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान

पुरुष -८८४५७

स्त्री -७८८३१

इतर -०८

एकूण -१६७२९६

टक्केवारी – ४३.३६%

भोसरी विधानसभा मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत ५५.०८ टक्के एवढे मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. आता शेवटचा एक तास बाकी असून किती टक्के मतदान होणार हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

भोसरी गावठाण परिसर तसेच समाविष्ट गावात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. नऊ वाजेपर्यंत ६.२१ टक्के एवढे मतदान झाले होते. अकरा वाजेपर्यंत १६.८३ टक्के मतदान झाले.  दुपारी १ वाजेपर्यंत ३०.४१ टक्के मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.१६ टक्के मतदान, तर सकाळी ५ वाजेपर्यंत ५५.०८ टक्के मतदान झाले आहे.

सकाळी 0७:00 ते 0५:00 वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान.

पुरुष :- १७८८४४

महिला :- १५६२६३

इतर :- १३

एकूण :- ३३५१२०

टक्केवारी :- ५५.०८ %

चिंचवड विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५०.०१ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. आता मतदानाला शेवटचा एक तास बाकी आहे.

मतदार संघात सकाळी सात वाजल्यापासून मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. नऊ वाजेपर्यंत ६.८० टक्के एवढे मतदान झाले आहे. तर ११ वाजेपर्यंत १६.९७ टक्के मतदान झाले होते. दुपारी १ वाजेपर्यंत २९.३४ टक्के मतदान झाले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ४०.४३, तर सकाळी ५ वाजेपर्यंत ५०.०१ टक्के एवढे मतदान झाले आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

दुपारी ५ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान

पुरुष :- १७५३०५

स्त्री :- १५६५४९

इतर :- ०७

एकूण :-३३१८६१

टक्केवारी :- ५०.०१

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button