ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
भोसरी मधून 14 वर्षीय मुलगी बेपत्ता
![14-year-old girl goes missing from Bhosari](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Missing.jpg)
पिंपरी चिंचवड | चक्रपाणी वसाहत भोसरी येथून 14 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 13) दुपारी घडली.याप्रकरणी एका महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 14 वर्षीय मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असल्याचा फिर्यादी यांना संशय आहे. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.