अनाथांसाठी 1 टक्का आरक्षण फडणवीस सरकारचेच – अमित गोरखे
पिंपरी चिंचवड | अनाथांसाठी 1 टक्का आरक्षण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने 2018 मध्ये जाहीर केले होते. मात्र नुकत्याच मंत्रिमंडळामध्ये झालेल्या बैठकीत 1 टक्का आरक्षण ठाकरे सरकारने दिले असे जाहीर केले. मागच्या सरकारने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याऐवजी आघाडी सरकारने आज जाहीर का केले? असा सवाल भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केला.
गोरखे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की राज्यातील महाविकासआघाडी सरकार खोटारडे आहे. घोटाळ्यांचे व्यासपिठ असून हे सर्वांना माहीत आहे.
जो निर्णय 2018 मध्ये झाला. तोच तुम्ही आता नवीन म्हणून सांगताय याचा काय अर्थ ? फडणवीस सरकारने केलेल्या कामावरच तुम्ही अजून नारळ फोडत आहात. श्रेय लाटत आहेत असे आजपर्यंत देशात कुठेही घडले नव्हते. मात्र ते ठाकरे सरकारच्या कालखंडात घडले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने याचा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी निषेध केला आहे.





